💥सेलू तहसिल कार्यालयात कार्यरत लाचखोर महसूल सहाय्यक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या ताब्यात...!


💥संजय गांधी निराधार योजनेतील अर्थ सहाय्य मिळवून देण्यासाठी वृध्द महिलेच्या लातलगास लाचखोर तमशेटेने मागितली होती लाच💥

परभणी (दि.१२ आगस्ट) - जिल्ह्यातील सेलू येथील तहसिल कार्यालयात कार्यरत लाचखोर महसूल सहाय्यक संदिप तमशेटे याने संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थी वृध्द महिलेला अर्थ सहाय्य मिळवून देण्यासाठी वृध्द महिलेच्या नातेवाईकास १ हजार रुपयांची लाच दि.०१ आगस्ट २०२२ रोजी मागीतली होती या प्रकरणी संबंधित वृध्द महिलेच्या नातलगाने लाच लुचपत विभागाकडे रितसर तक्रार दाखल केली होती या तक्रारी नंतर लाच सुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी पडताळनी केली असता तक्रारीत सत्यता आढळल्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने यशस्वी सापळा रचून संबंधित लाचखोर महसूल सहाय्यक सदरील लाचेची १ हजार रुपये रक्कम स्विकारतेवेळी लाचखोर संदिप अश्रुबा तमशेटे यास स्वतः त्यांच्या तहसिल मधील महसूल कार्यालयात दि.११ आगस्ट २०२२ रोजी पंचा समक्ष रंगेहात ताब्यात घेतले. 

सदरील कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभाग परिक्षेत्र नांदेडचे पोलिस अधिक्षक डॉ.राजकुमार शिंदे,अप्पर पोलिस अधिक्षक धरमसिंग चव्हाण परिक्षेत्र नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी जिल्हा लाच लुचपत प्रतिबंधक विभागातील पर्यवेक्षण अधिकारी पोलिस उपअधिक्षक किरण बिडवे,सहाय्यक सापळा अधिकारी पोलिस निरिक्षक सदानंद वाघमारे,सापळा अधिकारी पो.नि.बसवेश्वर जकीकोरे,सापळा कारवाई पथकातील सहकारी पोलीस हवालदार हनुमंते,पोलीस हवालदार कटारे,पोलिस हवालदार शेख मुकीद,चालक पोना कदम,पोलीस हवालदार हनुमंते,पोलीस हवालदार कटारे,पोलिस हवालदार शेख मुकीद, चालक पोना कदम यांनी यशस्वीपणे पार पाडली घटने संदर्भात पुढील तपास पोलिस उपअधिक्षक किरण बिडवे हे करीत आहेत.


➡टोल फ्रि क्रं. 1064

कार्यालय दुरध्वनी - 02452-220597

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या