💥परभणी येथे महागाई जीएसटी बेरोजगारी व अग्निपथ विरोधात काँग्रेस पक्षाकडून जोरदार निदर्शने....!


💥जीवनाशक वस्तूंवरही जीएसटी लावून या सरकारने सर्वसामान्य नागरिकांना अक्षरशः देशोधडीला लावले💥

परभणी (दि.०५ आगस्ट) : देशातील वाढती महागाई,जीएसटी बेरोजगारी व अग्निपथ विरोधात काँग्रेस पक्षाच्या वतीने आज शुक्रवार दि.०५ आगस्ट रोजी परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करीत केंद्र सरकारचा तिव्र निषेध नोंदवला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने गेल्या काही वर्षांपासून चुकीची धोरणे अवलंबिली, मनमानी कारभार सुरू केला, त्याचा परिणाम सर्वदूर महागाईचा आगडोंब उसळला, असे असताना सुद्धा जीवनाशक वस्तूंवरही जीएसटी लावून या सरकारने सर्वसामान्य नागरिकांना अक्षरशः देशोधडीला लावले आहे असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

पेट्रोल, डिझेल, एलपीजी, गॅस, सीएनजी, पीएनजी चे दर दिवसेंदिवस वाढत आहेत, महागाईने जनता त्रस्त असताना दूध, दही, पनीर, आटातील तूप यासह अन्य जीवनावश्यक वस्तूंवरही जीएसटी लादण्यात आली आहे. शाळकरी मुलांनाही शालेय वस्तूंवरही जीएसटी लावण्यात आली,रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांवरही जीएसटी लावण्यात आली, हे प्रकार भयावह आहेत असा आरोप या आंदोलनकर्त्यांनी केला .

जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष आमदार सुरेश वरपूडकर,महानगर जिल्हाध्यक्ष नदीम इनामदार यांनी जिल्हा प्रशासनात सादर केलेल्या निवेदनाद्वारे अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत.

 दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय सोबत आयोजित केलेल्या या निदर्शनात जेष्ठ नेते भगवानराव वाघमारे, बाळासाहेब देशमुख,मलेका गफार,श्रीधरराव देशमुख, गफार मास्टर, जयश्री खोबे, इरफानूर रहमान खान,विनोद कदम, गुलमीर खान, मिनाज कादरी, तुकाराम साठे, बाळासाहेब रेंगे, श्रीमती दुरानी,सत्तार पटेल दिगंबर खरवडे, अब्दुल सत्तार, सुहास पंडित जानू बी , श्रीकांत पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते.

 या संतप्त कार्यकर्त्यांनी आंदोलन स्थळी चूल पेटून प्रतिकात्मक स्वयंपाक केला. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात या आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली त्यामुळे आंदोलन स्थळ दणाणून गेले ,दरम्यान या आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करून महागाई सह अन्य चुकीच्या धोरणांचा निषेध केला तसेच अतिवृष्टी ग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करावी अशी अपेक्षा या निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या