💥परभणीच्या जिल्हा कारागृहात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न...!


💥या कार्यक्रमात मोठ्या उत्साहात पुरुष व महिला बंदी कैद्यांचा सहभाग💥

परभणी (दि.12 आगस्ट) : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि हर घर तिरंगा मोहिमे अंतर्गत  परभणी जिल्हा  कारागृहातील बंदयांसाठी "जीवन गाणे गातच जावे" हा अभिनव उपक्रम महाराष्ट्र सांस्कृतिक संचानलयाच्या वतीने परभणीतील जिल्हा कारागृहात आयोजित करण्यात आला होता, संपुर्ण  देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना कारागृहातील बंदीसाठी ही 75 वा अमृत महोत्सव साजरा करुन मोठ्या उत्साहात पुरुष व महिला बंदी सहभागी झाले होते. 

            न्यायालयीन बंदी असलेल्यांना तडजोड पात्र व मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशान्वये नियमाप्रमाणे पात्र बंदीना लाभ देण्याविषयी माहिती विधी प्राधिकरणाचे सचिव संतोष लांडगे यांनी यावेळी दिली.  कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संतोष लांडगे, तसेच  अध्यक्षस्थानी कारागृह अधीक्षक  गोविंद राठोड तसेच व्यासपीठावर वरिष्ठ तुरुंग अधिकारी प्रशांत  पाटील, तुरुंग अधिकारी नरोड, श्री. सुर्यवंशी, ॲड  अमोल गिराम, नितीन वाव्हळे उपस्थित होते.

            बंदिस्त बंदीना ही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात सहभागी करुन बंदीच्या कला गुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक विभागातर्फे समुपदेशन, प्रबोधन आणि सांस्कृतिक कार्यक्रमात देशभक्ती, थोर संत, महापुरुषांचा गौरवशाली इतिहास असे विविध कार्यक्रम घेण्यात आले. सदर कार्यक्रमादरम्यान सर्व निलेश कड, अरुण जोगदंड, उमेश चाबुकस्वार, ईश्वर शिंदे, आकाश वाघमारे, अरुण विटेकर, कुणाल शिंदे, अशोक, वैभव सुरवसे, माधव बोडखे तसेच श्रीमती अंजली पाटोळे, पृथ्वी काळे, हेमलता धुमाने, शारदा कंटाळे यांनी लोकन्यृत्य, भारुड, देशभक्तीपर गीत इत्यादीचे उत्कृष्ट सादरीकरण केले.

            आरती क्रिएशन कलामंचच्या वतीने परभणी जिल्हा कारागृहातील बंदीसाठी सांस्कृतीक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. तसेच बंदीच्या समूहाने विविध कलेचे सादरीकरण केले. या कार्यक्रमाला बंदीचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कारागृह अधिकारी तसेच  गौरव कोंडेकर,  साईनाथ अंधारे, श्री. उमीनवाडे तसेच कारागृह कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन  नितीन वाव्हळे यांनी केले तर आभार वरिष्ठ तुरुंगाधिकारी प्रशांत पाटील यांनी मानले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या