💥पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथील तीन पिढ्यांपासून राऊत कुटुंबांची राष्ट्रध्वजाची विनामूल्य इस्रीद्वारे सेवा....!


💥देशभक्ती साठी धनाची नसून मोठ्या मनाची गरज असते - किरण राऊत

पुर्णा (दि.१६ आगस्ट) - भारत देशाचा अभिमान असलेल्या तिरंगा या राष्ट्रध्वजासाठी अनेकजण आपल्या प्राणांची आहुती देवुन देशसेवा करीत असतात. सध्या संपूर्ण देशात तीन दिवस 'हर घर तिरंगा' हा उपक्रम राबवुन प्रत्येक नागरिक राष्ट्रध्वजाप्रती निष्ठा जपत असुन पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथील राऊत कुटुंब मात्र गत तीन पिंढ्यापासुन ताडकळस येथील विविध शासकीय व निम्मशासकिय कार्यालयात राष्ट्रीय सणानिमित्त फडकविण्यात येणाऱ्या तिरंगा ध्वजाची विनामूल्य इस्री करुन एकप्रकारे देश सेवा करीत आहे. 

या बाबत अधिक माहिती अशी की, भारत देशाची आण-बाण-शान असलेला तिरंगा ध्वज हा प्रत्येक नागरीकांसाठी अभिमान आहे. या राष्ट्रीय ध्वजाचा प्रत्येक जण गौरव करीत असतो. सीमेवर डोळ्यात तेल घालून या ध्वजाच्या रक्षणासाठी अनेक देशभक्त आपल्या प्राणांची आहुती देखील देतात. या वर्षी स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सव निमित्ताने देशात हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक नागरिक आपल्या घरावर तिरंगा ध्वज लावुन देशाविषयी अभिमान प्रगट करीत आहे. ताडकळस येथील मात्र राऊत कुटुंब मात्र गत तीन पिढ्यांपासून १५ आँगस्ट, स्वातंत्र्य दिन,२६ जानेवारी प्रजासत्ताक दिन, १ मे महाराष्ट्र  दिन व १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ताडकळस येथील ग्रामपंचायत कार्यालय, पोलीस ठाणे, प्राथमिक आरोग्य केंद्र, विविध शाळा, बँक अशा विविध ठिकाणी फडकविण्यात येणाऱ्या तिरंगा ध्वजाची विनामूल्य इस्री करुन एकप्रकारे देश सेवा करत आहेत. सध्या किरण लक्ष्मणराव राऊत हे काम करीत असून यापुर्वी त्यांचे आजोबा दत्तराव बापुराव राऊत व वडील लक्ष्मणराव दत्तराव राऊत यांनी ही सेवा केली आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या