💥पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथे बचत गटातील महिलांची आरोग्य तपासणी व जनजागृती अभियान संपन्न....!


💥स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त सात ते आठ कार्यक्रम संपन्न💥                                    

 महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालय परभणी स्थापित उत्कर्ष  लोकसंचलित साधन केंद्र ताडकळस व प्राथमीक आरोग्य केन्द ताडकळस आरोग्य विभाग जिल्हा परीषद परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने. 


🇮🇳 स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव 🇮🇳

निमित्त बचत गटातील महिलांची आरोग्य तपासणी व जनजागृती अभियानचे आयोजन करण्यात आले त्यात

*तिरंगा पाककला प्रदर्शन* 

*वृक्षा रोपन*

 *परसबाग बियाणे किट वीक्री*

*विरमाता सन्मान*

*तीरंगी रांगोळी प्रदर्शन*

*मेंहदी प्रदर्शन*

*तिरंगा विक्री स्टाल*

असे सात ते आठ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख उपस्थितांध्ये पुर्णा पंचायत समिती गटविकास अधिकारी सुनिता वानखेडे,ताडकळस ग्रामपंचायतीचे सरपंच गजानन अंबोरे,जिल्हा समन्वय अधिकारी, माविम परभणी बाळासाहेब झिंजाडे,ताडकळस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ.कल्पना आळने,पुर्णा तालुका आरोग्य विभागाचे प्रतिनिधी वंसत कांबळे,विस्तार अधिकारी श्री.पोटे पुर्णा,पुर्णा तालुका कृषी विभागातील कृषी सहाय्यक सुरेश काळे,सिएमआरसी सचिव संगिता अंबोरे यांच्या ताडकस परिसरातील सर्व पत्रकार,प्रतिष्ठित नागरिक ग्रामपंचायत सदस्य सुरेश मगरे ताडकळस,सिएमआरसी व्यवस्थापक गंगासागर भराड तसेच सिएमआरसी आणि पिएचसी चे सर्व कर्मचारी उपस्थित होते.  

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राजक्ता घटमाळ,करण तुपसमीन्द्रे, माया पढेल,ज्योती चौरे, मीरा पुरी,अर्चना जगाडे,वर्षा काळे, सौ गूरव,.खोत. नवले, मकासरे, नवले,साखरे यांच्यासह सिएमआरसी आणि पिएचसीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य  केले.

प्रस्ताविक बाळासाहेब झिजाडे यांनी केले तर सुत्रसंचलन गंगासागर भराड यांनी केले व आभारप्रदर्शन जगदीश नवले यांनी केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या