💥जिंतूर ग्रामीण रुग्णालयात मागील सहा महिन्यापासून रुग्णांना दररोज दोन टाईम मोफत डब्बे वाटपाचा कार्यक्रम चालू....!


💥आनंदधाम आश्रम माहुरगड चे मठाधिपती दभप.साईनाथ महाराज बिदनाळकर यांच्या वतीने मोफत डब्बे वाटप💥

  जिंतूर प्रतिनिधी / बि.डी. रापुरकर 

ग्रामीण रुग्णालयात मागील सहा महिन्यापासून रुग्णांना दररोज दोन टाईम मोफत डब्बे वाटपाचा कार्यक्रम चालू असून आनंदधाम आश्रम माहुरगड चे मठाधिपती दभप.साईनाथ महाराज बिदनाळकर यांच्या वतीने ग्रामीण व्यवस्थित चालू आहेत .

जिंतूर येथे मागच्या सहा महिन्यापूर्वी सुरू केलेले रुग्णांना दोन वेळा मोफत डबा सेवाअन्नदान व्यवस्थित रितीने चालू आहे... हा उपक्रम गोरगरीब रुग्णांना खूप फायदेशीर ठरत आहे... आज महाराज जिंतूर तालुक्यात आले असता त्यांनी जिंतूर ग्रामीण रुग्णालयास अचानक भेट देऊन  आजच्या डब्यांचे वाटप करत रुग्णांची विचापूस केली यावेळी जिंतूरचे मा.नगरसेवक .गणेश कुरे,साडेगावचे उपसरपंच प्रल्हाद देवडे, .रामप्रसाद रवंलळे,.दत्ताराव मुटकुळे, .संसारे, .वैजनाथ भुजबळ ,लिंबाजी पारदे नवनाथ देशमुख, अशोकराव देशमुख, एकनाथ देशमुख व इतर शिष्य मंडळींची उपस्थिती होती......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या