💥परभणी जिल्ह्यातील जाती-धर्माच्या राजकारणामुळे संपूर्ण जिल्ह्याचा विकास खुंटला - जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने


💥पाथरा येथील सत्कार समारंभात बोलताना व्यक्त केले मनोगत💥

परभणी (दि.१८ आगस्ट) - तालुक्यातील पाथरा येथे असलेल्या मुस्लिम कब्रस्तान मध्ये दरवर्षी पावसाचे पाणी साचत असल्याने तेथे दफनविधी करणे शक्य होत नव्हते शिवाय तिथे दफन करण्यात आलेल्या मृतदेहांची विटंबना होत होती याबाबत मागील १५-१६ वर्षापासून गावातील नागरिक ग्रामपंचायत व जिल्हा प्रशासनाकडे वेळोवेळी मागणी करूनही कबरस्थानच्या बाजूला असलेल्या नाल्याचे रुंदीकरण व नाला साफ करण्याचे काम होत नव्हते दोन महिन्यापूर्वी याबाबत पाथरा गावातील ग्रामस्थांनी प्रहार जनशक्ती पक्षाकडे लेखी तक्रार करून याबाबत प्रशासनाचे पाठपुरावा करून न्याय मिळवून द्यावा असे विनंती केली होती. 

ग्रामस्थांच्या या विनंतीची तात्काळ दखल घेत प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांनी पक्षाच्या पदाधिकारी व पाथरा गावातील ग्रामस्थासह जिल्हाधिकारी मॅडम परभणी व गटविकास अधिकारी परभणी यांची भेट घेऊन निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला होता. प्रहार जनशक्ती पक्षा च्या आंदोलन इशाऱ्या नंतर जिल्हाधिकारी व पंचायत समिती परभणी यांच्या आदेशाने पंधरा दिवसांपूर्वी नाल्याचे रुंदीकरण करून नाल्यावरील अतिक्रमण काढण्यात आले.

प्रहार जनशक्ती पक्षामुळे पाथरा गावातील मुस्लिम धर्मीय कब्रस्तान मध्ये पाणी साचण्याचा विषय कायमस्वरूपी मार्गी लागल्यामुळे पाथरा गावातील गावकऱ्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा जाहीर सत्कार कार्यक्रम पाथरा येथे आयोजित केला होता त्या कार्यक्रमा वेळी उपस्थित ग्रामस्थांना संबोधित करताना प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने यांनी सांगितले की प्रहार जनशक्ती पक्ष हा जात व धर्म पाहून जनतेचे काम करत नाही तर समाजातील सर्व दुर्लक्षित घटक व सर्व जाती-धर्मांच्या लोकांना एकत्रित घेऊन विकासाच्या कामावर भर देणारा पक्ष आहे. मा. आ. बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभरामध्ये विकासाच्या मुद्द्यावर प्रहार जनशक्ती पक्ष ताकतीने काम करत असून आज पर्यंत झालेल्या जाती-धर्माच्या भावनिक राजकारणामुळेच जिल्ह्यासह खेड्यांचाही विकास खुंटला आहे असे मत यावेळी व्यक्त केले. 

या कार्यक्रमाला प्रहार जनशक्ती पक्षाचे परभणी जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हाप्रमुख गजानन चोपडे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख माधवीताई घोडके, उपजिल्हा प्रमुख रामेश्वर जाधव, तालुका प्रमुख ज्ञानोबा काळे,शेतकरी आघाडी तालुका प्रमुख सय्यद मुस्तफा, मटकराळा शाखा प्रमुख उद्धव गरुड, महिला आघाडी शहर प्रमुख आरतीताई जुमडे, शहर चिटणीस वैभव संघई, सय्यद लतीफ, शेख साबीर, सय्यद रफिक, सय्यद समीर, शेख अजगर, शेख निसार, पिराजी पलये, सय्यद बाबू, सोपान शिंदे, सरफराज पठाण, बाबुराव कांडे, कुंडलीक गरुड, शेख खाजा, सय्यद मुस्तफा, सय्यद हुसेन, शेख अफसर नारायण गरुड सय्यद मजहर मनोहर देशमुख, देविदास जाधव, शेख राजू, सय्यद नाजर, शेख हुसेन, सय्यद अजहर, दिनकर देशमुख, शेख अमजद, सय्यद हर्षद, राहुल मस्के, सय्यद मुर्तूज, राजेश कांबळे, कृष्णा कांडे, शेख रशीद, सय्यद चांद, सय्यद कबीर, पठाण अरबाज, भागवत बालटकर यांच्यासह मोठ्या प्रमाणावर गावकरी उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या