💥पुर्णा तालुक्यातील पांगरा ढोणे येथे आजपासून अखंड हरिनाम सप्ताहात सुरूवात....!


💥मंगळवार दिनांक 9 आगस्ट ते बुधवार 17 आगस्ट पर्यंत  अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात झाली आहे💥

पुर्णा/ प्रतिनिधी.

पुर्णा (दि.०८ आगस्ट) - तालुक्यातील पांगरा ढोणे येथे श्री संत मोतीराम महाराज यांच्या (58व्या) पुण्यतिथीनिमित्त मंगळवार दिनांक 9 आगस्ट ते बुधवार 17 आगस्ट पर्यंत  अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात झाली आहे.

यामध्ये दररोज पहाटे 4ते 6 काकड आरती.6ते 10 ज्ञानेश्र्वरी पारायन.10ते 2 तुकाराम गाथा भजन.3ते4 ज्ञानेश्र्वरी प्रवचन.6 ते 7 हरीपाठ.9ते11हरी किर्तन.नंतर हरी जागर.मंगळवार 9 रोजी ह.भ.प.न्याय व विधी तद्न् अँड यादव महाराज डाखोरे वाईकर.

बुधवार

10रोजी. ह.भ.प.बबन महाराज मुडीकर.

गुरुवार 11रोजीह.भ.प. दिपक गुरु महाराज पांगरा.

शुक्रवार 12रोजी ह.भ.प.राम महाराज सुगावकर.

शनिवार 13रोजीह.भ.प. माधव महाराज फुलकळसकर.

रविवार 14रोजी ह.भ.प.भगवान महाराज लहानकर.

सोमवार 15रोजी ह.भ.प.हरी महाराज बुचाले आव्हईकर.

मंगळवार 16रोजी सकाळी श्री संत मोतीराम महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक निघेल.दुपारी 1ते3 पुजेचे किर्तन ह.भ.प.भागवत महाराज ठाकुर बुवा कावलगावकर यांचे होईल 3ते 7सामुदाविक महाप्रसाद होईल व राञी 9ते11 ह.भ.प.भगवान गुरुजी ढोणे पांगरा यांचे किर्तन  होईल.

बुधवार 17रोजी सकाळी 9ते11 ह.भ.प.महेश महाराज आळंदीकर यांचे काल्याचे किर्तन होईल नंतर या कार्यक्रमाची सांगता होईल या कार्यक्रमात पंचक्रोशीतील भाविक भंक्तानी सहभागी व्हावे असे आवाहन गावकरी मंडळी पांगरा ढोणे यांनी केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या