💥पुर्णा तालुक्यातील गौर गावाच्या विकासासाठी केंद्रशासनासह राज्यशासनाने ही दिला कोट्यावधीचा शासकीय विकासनिधी....!


💥अन् भ्रष्ट गौर ग्रामपंचायत प्रशासनाने तरी देखील सोईस्कररित्या पार पाडला गौर गावातील विकासाचा अंत्यविधी ?💥


(भाग क्र.०३) : गाव तस चांगल पण.....

✍🏻परखड सत्य :- चौधरी दिनेश -

पुर्णा (दि.०३ आगस्ट) - तालुक्यातील गौर जिल्हा परिषद सर्कल मधील सर्वात जास्त लोकसंख्येसह धार्मिक पर्यटन स्थळांमधील एक महत्वाचे हेमाडपंथी मंदिरासह भव्य बारव असलेले जागृत देवस्थान सोमेश्वर महादेव संस्थान या ग्रामदैवताच्या भव्य मंदिराने सुशोभित असलेले पुर्णा-नांदेड राज्य महामार्गावर बसलेले मौ.गौर गाव.....या गावातील जागृत देवस्थान असलेल्या सोमेश्वर महादेव मंदिराच्या नावावर मोठ्या प्रमाणात शेत जमीन असून या जागृत श्री सोमेश्वर महादेवाच्या दर्शनाला श्रावण महिण्यात मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात या गौर गावातूनच याच सर्कल मधील गंगाजी बापू देवस्थान पिंपळगाव येथे जाण्यासाठी देखील मधला मार्ग असून या मार्गाने हजारो भाविक भक्त प्रत्येक आमावस्या आणि पोर्णीमेला गंगाजी बापू देवस्थानाच्या दर्शनासाठी जात असतात परंतु गौर गावासह या गावील मार्गावरून मार्गक्रमण करणाऱ्या त्या भाविक भक्तांचे दुर्दैवच म्हणावे लागेल की केंद्र सरकार व राज्य सरकारचा कोट्यावधी रुपयांचा शासकीय विकासनिधी या गौर गावासह येथील रस्त्यांच्या विकासाठी आल्यानंतर देखील तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या ताब्यातील तसेच भाजपा पुर्णा तालुकाध्यक्ष अनंतराव पारवे यांच्या सौभाग्यवती सौ.चांगुनाबाई अनंता पारवे सरपंच असलेल्या गौर ग्रामपंचायतचे भ्रष्ट ग्रामविकास अधिकारी लाडेकर व सरपंच प्रतिनिधी तथा सरपंच पती अनंतराव पारवे यांनी या शासकीय विकासनिधीचा योग्य पध्दतीने वापर न करता कागदोपत्री कामे दाखवून पंचायत समिती/जिल्हा परिषद प्रशासनातील भ्रष्टाचाऱ्यांशी आर्थिक हितसंबंध जोपासत सोईस्कररित्या शासकीय विकासनिधी गिळकृत करीत संपूर्ण गावाच्या विकासाचा अंत्यविधी सोईस्कररित्या पार पाडीत पिंडावरील कावळ्या प्रमाणे आर्थिक पिंड पदरात पाडून घेतला त्यामुळे सदरील गाव विकासापासून वंचित राहिल्याचे निदर्शनास येत असून गौर गावात पाऊल टाकल्यास पावला पावलावर गावातील विकासाच्या अंत्यसंस्काच्या खुना पाहावयास मिळतात ना रस्त्यांचा विकास....ना सांडपाण्याचे नियोजन खुल्या नाल्यांसह बंदिस्त नाल्यांची देखील दुरावस्था....गावातील पाणीपुरवठा योजनेसाठी कोट्यावधी रुपयांचा शासकीय विकासनिधी गौर ग्रामपंचायतला प्राप्त झाल्यानंतर देखील ग्रामस्थांना ग्रामपंचायत प्रशासनाकडून घरपोच पाणीपुरवठ्याची व्यवस्था नाही फक्त पंचायत समिती/जिल्हा परिषद प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी गावात आल्यानंतर त्यांना अत्यंत सुंदर अशी रंगरंगोटी केलेली गावातील पाण्याची टाकी व चार/दोन घरातील पाण्याचे नळ दाखवली की बिल पास 'अंधेर नगरी चौपट राज...कोट्यावधीचा शासकीय विकासनिधी गिळून ग्रामविकास अधिकारी/सरपंच पंचायत समिती बिडीओ/बिल पास करणारा लिपीक/ अभियंता आदींसह सर्वच भ्रष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांना चढला माज.....अशी एकंदर अवस्था झाल्याचे निदर्शनास येत आहे.

💥भ्रष्ट कारभार दडपण्यासाठी म्हणे तळ राखणारा पाणी तर पिणारच ? अहो पण तळ राखणा अहो पण तळच गिळल तर....?


भ्रष्टाचारावर सोईस्कररित्या पांघरूण घालण्यासाठी व भ्रष्टाचार सोईस्कररित्या दडपणौयासाठी सरपंच पारवे यांच्या समर्थक चांडाळ चौकडींनी गौर गावात भ्रष्टाचारा विरोधात आवाज उठवणाऱ्यांची तोंड दाबण्यासाठी 'अहो तळ राखणारा पाणी तर पिणारच ना ? असा प्रश्न उपस्थित करीत अक्कलेचे तारे तोडण्याचा केवीलवाणा प्रकार चालवला असल्याचे निदर्शनास येत असले तरी गावाच्या विकासाच्या नावावर कोट्यावधी रुपयांचा व ग्रामदैवत असलेल्या सोमेश्वर महादेव मंदिर देवस्थासह बारव दुरुस्तीच्या नावावर लाखो रुपयांचा अपहार करून केलेले पाप झाकले जाणार आहेत का ? या जागृत देवस्थानाच्या दर्शनासाठी येणारा प्रत्येक भाविक भक्त मंदिराला दाण देण्यात स्वतःला धन्य समजतो परंतु याच गावच्या ग्रामपंचायत प्रशासनाचा कारभार चालवणारे सरपंच पारवे व ग्रामविकास अधिकारी लाडेकर यांच्याकडून मात्र या जागृत देवस्थानाच्या बारव दुरुस्तीच्या नावावर बारवाचा एक दगड देखील इकडचा तिकडे न हलवता तब्बल ६ लाख १९ हजार ९११ रुपयांचा अपहार केला जातो यापेक्षा लाजीरवाणी गोष्ट कोणती ? पाणीपुरवठा योजनेसाठी कोट्यावधी रुपयांचा शासकीय निधी प्राप्त झाल्यानंतर देखील या गौर गावात पिण्यासह सांडपाण्याचा प्रश्न गंभीर झाला असतांना तळ राखतो तो पाणी पिणारच ना ? असा प्रश्न उपस्थित करणारे किती निर्जज्ज ? अहो ज्याला तुम्ही तळ राखायला दिला त्याने तर संपूर्ण तळच गिळल्यागत गंभी प्रकार झाला की ?.... 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या