💥जिंतूर तालुक्यात महामार्ग चेक पोस्टवर उधार वर्दी देऊन महामार्ग पोलिसांची वाहनचालकाकडून लूट ?


💥हा प्रकार तात्काळ थांबवावा अशी मागणी नियाज खान गफूर खान पठाण यांनी निवेदनात केली आहे💥

जिंतूर प्रतिनिधी   / बी.डी.रामपूरकर

जिंतूर तालुक्यात महामार्ग चेक पोस्ट एक अधिकृत तर दुसरे अनाधिकृत या दोन्ही महामार्ग चेक पोस्टवर अनाधिकृत खाजगी मानसे लावून परराज्यातून येणारे ट्रक व जिप, टूर  वाहन चालकाकडून सर्रास व बिनधास्त पणे वसुली केली जात असल्याची तक्रार महामार्ग पोलीस अधीक्षक औरंगाबाद यांना देऊन हे सर्व प्रकार तात्काळ बंद न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा नियाज  खान गफूर खान पठाण यांनी निवेदनात दिला आहे.


               देवगाव फाटा महामार्ग पोलीस चौकीवर खाजगी व्यक्ती वाहन चालकाकडून आम्हीच महामार्ग पोलीस असल्याची बतावणी करून अव्वाच्या  सव्वा वसुली करत  अनाधिकृतपणे खाजगी माणसे लावून  चालते अशाच प्रकारची जिंतूर औंढा रोडवर ही खाजगी व्यक्तीमार्फत वसुली सुरू असल्याची मोहीम राबवली जात आहे.

या ठिकाणी सदरील चौकीवर एकापेक्षा जास्त  खाजगी व्यक्तीची नेमणूक महिनेवारी करण्यात आली असून सदरील व्यक्ती वाहनधारकांकडून आडून वसुली करण्याचे काम सुरू आहे व तीही खऱ्या कर्तव्य बजावणाऱ्या गणवेशातील कर्मचाऱ्यांच्या समोर  बिनधास्तपणे वसुली चालू असते त्यामुळे परराज्यातून  येणाऱ्या वाहनधारकांना त्यांचा त्रास सहन करावा लागत आहे हा प्रकार तात्काळ थांबवावा अशी मागणी नियाज खान गफूर खान पठाण यांनी निवेदनात केली आहे.

* सांकेतिक स्टॅम्प चा वापर :-

सदरील वाहन चौकी पास केल्यांचे व हप्ता वसुली झाल्याबद्दल छोट्या डायरीवर सांकेतिक स्टॅम्प मारून त्या वाहनास पुढील चौकीवर धोका  नसल्याचा  ईशारा दीला जातो.

हा सर्व प्रकार तात्काळ न थांबल्यास दिनांक 14 ऑगस्ट 2022 रोजी महामार्ग पोलीस अधीक्षक, औरंगाबाद यांचे कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा तक्रारकर्त्यांनी दिला असून त्यांचे प्रती,

मा. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई, मा. पोलीस संचालक मुंबई, मा. अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक विभाग) मुंबई, व मा. पोलीस अधीक्षक परभणी. यांना माहितीस्तव व योग्य त्या कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्याची तक्रारीत म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या