💥नांदेड जिल्ह्यातील झुंजार व्यक्तीमत्व लोकनेते माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचे दुःखद निधन


💥त्यांच्या पार्थिवावर आज दि.२५ ऑगस्ट रोजी दुपारी ४:०० वाजता गोरठा ता.उमरी येथील आनंदीधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार💥

नांदेड (दि २५ आगस्ट) - नांदेड जिल्ह्यातील झुंजार व्यक्तीमत्व, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार बापूसाहेब उर्फ श्रीनिवास बालाजीराव देशमुख गोरठेकर यांचे आज दिनांक २५ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२:०५ वाजता नांदेड येथे अश्विनी हाॅस्पिटल येथे अल्पशा आजाराने निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर दिनांक २५ ऑगस्ट रोजी दुपारी ४:०० वाजता गोरठा ता उमरी येथील आनंदीधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

बापूसाहेब गोरठेकर हे शरद पवारांचे विश्वासू सहकारी होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, जिल्हा बँकेचे अध्यक्ष, भोकर मतदार संघाचे आमदार म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. जिल्ह्यातील अनेक सहकारी संस्था व शेक्षणिक संस्थांचा कारभार त्यांनी उत्कृष्टपणे सांभाळला. 

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे बापूसाहेबांच्या निधनाचे वृत्त समजताच संपूर्ण भोकर, नायगाव,उमरी व धर्माबादसह नांदेड जिल्ह्यात शोककळा पसरली आहे वृत्त संजय देशमुख कामनगावकर यांनी कळवले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या