💥पुर्णेतील स्वतंत्र सैनिक सुर्यभानजी पवार महाविद्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची शाखा स्थापन...!


💥यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष रुपेश देशमुख यांची प्रमुख उपस्थिती💥 

परभणी (दि.०६ आगस्ट) - परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरातील श्री स्वतंत्र सैनिक सुर्यभानजी पवार महाविद्यालयात काल शनिवार दि. 06 ऑगस्ट, 2022 रोजी  मनसे नेते व मनविसे अध्यक्ष अमितजी ठाकरे यांच्या आदेशाने तसेच मनविसे सरचिटणीस मा. राजीव जावळीकर आणि मनविसे सचिव मा.अक्षय काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष रुपेश देशमुख यांच्या हस्ते आणि मनविसे जिल्हाध्यक्ष अर्जुन टाक यांच्या नेतृत्वात पूर्णा मनविसे तालुकाध्यक्ष पवन बोबडे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे युनिट (शाखा) स्थापन केले. युनिट अध्यक्ष पदी दिगंबर कदम युनिट उपाध्यक्ष पदी माऊली गिराम व प्रल्हाद काळे, युनिट सचिव पदी विजय आढाव आणि युनिट सदस्य बळीराम रेनगडे, प्रमोद पारवे, सोहेल शेख, राज शिंदे, अर्जुन गिराम आणि शेख अल्ताफ यांची निवड करण्यात आली. 

युनिट स्थापनेच्या वेळी मनसे जिल्हाध्यक्ष रुपेश देशमुख, पूर्णा तालुकाध्यक्ष अनिलभाऊ बुचाले, शहराध्यक्ष गोविंदभाऊ ठाकर, पूर्णा तालुका उपाध्यक्ष तुकाराम शिंदे, शहर उपाध्यक्ष पंकज राठोड, राजेश यादव, गुरुप्रसाद पुरी, राधेश्याम महामुने गणेश बुचाले, प्रमोद पारवे , आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या