💥पुर्णा तालुक्यातील माखणी गावचे सरपंच म्हणे भलतेच भारी शेतकरी हितासाठी बोलणाऱ्या पत्रकारालाच मारी...!


💥ताडकळसचे सहा.पो.नि.रामोड मात्र किरकोळ एनसी दाखल करून पत्रकाराला मारहाण करणाऱ्या सरपंचालाच तारी💥


पुर्णा (दि.२५ आगस्ट) - लोकशाही मार्गाचा अवलंब करीत जनसामान्यांच्या मतदानातून निवडून येणारे लोकप्रतिनिधी जर लोकशाहीचा विश्वासघात करीत जनसामान्यांच्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हिताला बाधक ठरत असतील तर लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारांनी जनहीतास्तव  स्वतःच्या स्वार्थापोटी लोकशाहीचा घात करणाऱ्या लोकप्रतिनिधी विरोधात प्रश्न उपस्थित करणे हा त्याचा गुन्हा ठरतो काय ? असा गंभीर प्रश्न पत्रकारांमध्ये उपस्थित करणारी घटना दि.२३ आगस्ट २०२२ रोजी पुर्णा तालुक्यातील ताडकळस पोलिस स्थानकाच्या हद्दीतील माखणी गावात घडली माखणी गावच्या ग्रामपंचायतीचे जनमतातून निवडून आलेले सरपंच तथा पुर्णा पंचायत समितीचे माजी सदस्य गोविंद हरिभाऊ आवरगंड यांच्यासह ग्रामसेवक,तलाठी यांनी मागील जुन/जुलै महिण्यात सातत्याने झालेल्या अतिवृष्टी मुळे अनेक शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांची नासाडी झाली असतांना देखील महसुल प्रशासनाला अतिवृष्टी मुळे पडलेल्या ओल्या दुष्काळा संदर्भातील अहवाल निरंक पाठवल्या संदर्भात कृषी सहाय्यक यांच्याकडून येथील प्रतिष्ठित शेतकरी तथा पत्रकार जनार्धन आवरगंड यांना माहिती मिळाली या विषयी पत्रकार आवरगंड यांनी शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून सरपंच गोविंद आवरगंड यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून विचारणा केली व गावातील काही प्रतिष्ठित शेतकऱ्यांशी देखील ओल्या दुष्काळा संदर्भात अहवाल निरंक आल्याबद्दल चर्चा केली व अहवाल निरंक गेल्यामुळे आपल्या गावातील शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळा संदर्भातील शासनाचे कुठलेही अनुदान मिळणार नाही ही बाब लक्षात आणून दिल्यामुळे सरपंच गोविंद आवरगंड यांचे पित्त खवळले व सरपंच गोविंद आवरगंड यांनी दि.२३ आगष्ट २०२२ रोजी सकाळी १०-०० वाजेच्या सुमारास गावातील मारोती मंदिरा समोर आव देखा ना ताव सरळ पत्रकार जनार्धन आवरगंड यांच्यावर आमच्यासह गावाची बदणामी करतोस का असे म्हणून हल्ला चढवत थापड बुक्क्यांनी मारहाण करीत त्यांच्यासह कुटुंबाला जिवे मारण्याची धमकी देत अक्षरशः लोकशाहीचा गळा घोटण्याचा गंभीर प्रकार केला.


 या घटने संदर्भात पत्रकार जनार्धन आवरगंड यांनी ताडकळस पोलिस स्थानकात फिर्याद दिली परंतु या झालेल्या प्रकाराचे गांभीर्य न ओळखता ताडकळस पोलिस स्थानकाचे सहा.पो.नि.विजय रामोड यांनी सरपंच गोविंद आवरगंड यांच्या बचावाचा पावित्रा घेत सरपंच गोविंद आवरगंड यांच्या विरोधात किरकोळ स्वरूपाची एनसी दाखल करीत घटनेतील पिडीत पत्रकाराच्या तोंडाला पाण पुसण्याचा गंभीर प्रकार केला त्यामुळे पत्रकारांमध्ये संताप व्यक्त होत असून लोकशाही मार्गाने जनमतातून निवडून आलेल्या एका लोकप्रतिनिधीने जनमताचा घात करीत लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभावर हल्ला चढवण्याचे दुष्कृत्य केल्यामुळे व ग्रामपंचायत अधिनियमाची पायमल्ली करीत दहशत निर्माण केल्या प्रकरणी सरपंच गोविंद आवरगंड यांचे सरपंचपद रद्द करण्यात यावे अशी मागणी जिल्ह्यातील जेष्ठ पत्रकार सुरेश जंपनगीरे जिल्हा प्रतिनिधी दैनिक सामना,हमीद मलिक अध्यक्ष बहुभाषीक पत्रकार संघ परभणी,दत्ता लाड दैनिक पुण्य नगरी जिल्हा प्रतिनिधी,प्रविण चौधरी दैनिक एकमत जिल्हा प्रतिनिधी आदींनी एका निवेदनाद्वारे जिल्हा पोलिस अधिक्षक जयंत मिना,जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्याकडे केली आहे....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या