💥जिंतूर व सेलू तालुक्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत सुरु असलेल्या बोगस कामांची सखोल चौकशी करा...!


💥जिंतूरचे माजी आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विजय भांबळे यांची जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्याकडे मागणी💥 

जिंतूर प्रतिनिधी / बी.डी.रामपूरकर

जिंतूर व सेलू तालुका जि.परभणी येथील मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत सुरू असलेल्या बोगस कामांची सखोल चौकशी करा आशी मागणी मा. आ. विजयराव भांबळे यांनी लेखी पत्राद्वारे जिल्हाधिकारी परभणी यांच्या कडे केली आहे..

मागील सन २०२० २०२१मधील ता. जिंतूर व ता.सेलू जि.परभणी या दोन तालुक्यामध्ये जोड रस्ता जांब (बु) ९५ लक्ष, जोड रस्ता सोरजा- १२० लक्ष, रामा २४८ ते शेक १७० लक्ष, धामनी ते तेलवाडी रस्ता १५५ लक्ष, येसेगाव ते कडसावंगी रस्ता- ६९५ - लक्ष, प्रजीमा २ ते बेलोरा तांडा रस्ता १०० लक्ष, रामा २५३ ते काजळी रोहीना ४०० लक्ष, जोडरस्ता कुडा रोड २०० लक्ष, रामा २५३ ते पिंपराळा रस्ता ६५ लक्ष, रामा २५३ ते वाकि- ५५लक्ष हि - कामे सुरु आहेत. सदर कामाचा दर्जा अतिशय निकृष्ठ करण्यात येत आहे, या सर्व बोगस कामांची मुद्दे निहाय चौकशी करण्यात यावी. त्यात वरील कामांना संबंधित खात्यांनी कार्यारंभ आदेश दिल्यानंतर ते काम विहित मुददीत पूर्ण करणे गरजेचे असताना बऱ्याच कामाची मुदत संपलेली आहे, म्हणून या सर्व कामांना नियमानुसार दंड लाऊन संबंधित गुत्तेदारास काळ्या यादीत टाकण्यात यावे. व तसेच वरील सर्व कामाच्या अंदाजपत्रकामध्ये. मुरूम टाकण्याचे प्रस्तावीत केलेले असतानाही सर्व कामांवर बाजूच्या शेतातील काळी माती टाकण्यात आलेली आहे, म्हणून सदर रस्ते आताच पावसाने खराब झाले आहेत. कामांवर GSB ४० मिमी, ६० मिमी या कामाला गिट्टीला लागणारा दगड चांगला वापरणे आवश्यक असताना हा सर्व दगड मुरमाड दगड वापरण्यात आला आहे, त्यामुळे आताच हा रस्ता संपूर्ण खराब होत आहे.वरील रस्त्यांवर बरेचसे पुल प्रस्तावामध्ये समाविष्ट आहेत. सदर पुल बांधकामास चांगल्या दर्जाची रेती व उत्तम दर्जाचे क्रशसँड वापरणे गरजेचे असताना त्या पुलावर बाजूच्या ओढ्यातील मातीयुक्त रेती व हलक्या दर्जाचे क्रशसँड वापरण्यात आले आहे, त्यामुळे पुढे भविष्यात हे पुल पडून मोठी हानी होऊ शकते. या सर्व पुलंच्या कामांना जे सिमेंट वापरले जात आहे ते सिमेंट ५३ ग्रेड चे न वापरता अत्यंत निकृष्ट दर्जाचे वापरण्यात आले आहे. जांब ते कुडा या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम मागील दीड महिन्यापूर्वी पूर्ण झाले आहे. या रस्त्यावर आजरोजी संपूर्ण खड्डे पडलेले आहेत.

वरील सर्व कामांची इतर जिल्ह्याचे वरिष्ठ अधिकारी यांची उच्चस्तरीय समिती गठीत करून सखोल चौकशी करण्यात यावी, तसेच चौकशीमध्ये जे कंत्राटदार दोषी आढळतील या सर्व कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे व शासनाच्या पैशाचा अपहार केल्या प्रकरणी संबंधितावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच चौकशी पूर्ण होऊन आहवाल येईपर्यंत कुठलेही देयके देण्यात येऊ नयेत. आशी मागणी मा. जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांच्या कडे मा.आ.विजयराव भांबळे यांनी पत्राद्वारे केली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या