💥परभणी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंबेडकरवादी संघटनांतर्फे जोरदार निदर्शने....!


💥अनुसूचित जाती व अल्पसंख्यांकावर जातीय मानसिकतेतून होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ करण्यात आली निदर्शन💥

परभणी (दि.23 आगस्ट) : संपूर्ण देशभरात अनुसूचित जाती, अल्पसंख्यांकांवर विकृती जातीय मानसिकतेतून हल्ले करणार्‍यांविरुध्द कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी संविधान बचाव समिती व आंबेडकरवादी संघटनांतर्फे आज मंगळवार दि.23 आगस्ट 2022 रोजी परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.

           रिपब्लिकन सेनेचे राज्य उपाध्यक्ष विजय वाकोडे, मौलाना रफियोद्दीन अशरफी, रवि सोनकांबळे, सौ. द्वारकाबाई गंडले, जाफर खान, मुफ्ती जहांगिर, सरुबाई जमधाडे, सौ. अनिता सरोदे, भूषण मोरे, यशवंत खाडे, प्रदीप वाहुळे, चंद्रकांत लहाणे, सिध्दार्थ कसारे, परमेश्‍वर चांदणे, विनायक साळवे, तुषार चांदणे, अ‍ॅड. इम्तियाज खान, चंद्रकांत बनसोडे, संजय भराडे, गौतम मुंढे, विजय शेळके, अविनाश अंबोरे, आशिष वाकोडे, राहुल घनसावंत, हर्षवर्धन काळे, संजय खिल्लारे, रवि खंदारे, दिपक ठेंगे, अमोल वाघमारे, विक्की कांबळे, अश्‍विनी शेळके, विशाल, बाळासाहेब गायकवाड, दिपक शिंदे, अर्जून पंडीत, संदीप खाडे, पंडीत कांबळे, शेख शकील यांच्यासह अन्य शेकडो कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करुन सर्व हल्ल्यांच्या प्रकरणात जलदगतीच्या न्यायालयामार्फत खटले चालवून संबंधित आरोपींविरोधात कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

            ज्येष्ठ नेते वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली ‘इन्साफ दो’ या आंदोलनाद्वारे आंदोलनकर्त्यांनी राष्ट्रपतींना पाठविलेल्या निवेदनातून इंद्र मेघवाल या शालेय विद्यार्थ्यास अमानूष मारहाण करीत खून करणार्‍या चैलसिंह यास फाशीची शिक्षा द्या, शिक्षण संस्थेची मान्यता रद्द कराव, शिक्षणाधिकार्‍यांना सह आरोपी करा, बिलकीस बानो यांच्यावरील अत्याचारासह कुटूंबियांची हत्या करणार्‍या गुन्हेगारांविरुध्द कठोर कारवाई करा, औरंगाबाद येथील जनार्धन कासारे यांच्यावरील हल्ल्या प्रकरणात आरोपींविरुध्द कठोर कारवाई करा, परभणी जिल्ह्यातील सिंगणापूर येथील गोविंद मोतीराम कांबळे यांचा जातीय भावनेतून खून करणार्‍या आरोपींना तात्काळ अटक करा, गायरान जमीनीचे प्रलंबित प्रश्‍न निकाली काढा, अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टची कडक अंमलबजावनी करा, संविधानीक मूल्यांची मुस्कटदाबी थांबवा यासह अन्य मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या.

यावेळी केलेल्या घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या