💥'हर घर तिरंगा' अभियान संपल्यानंतर देखील घरावर व वाहनांवर असलेले राष्ट्रध्वज सन्मानाने उतरवण्याचे आदेश काढा....!


💥प्रहार जनशक्ती पक्षाची जिल्हा प्रशासनाकडे मागणी💥

परभणी (दि.२० आगस्ट) - केंद्र सरकारच्या निर्देशानुसार देशासह परभणी जिल्ह्यामध्ये दि. १३ ऑगस्ट २०२२ ते १५ ऑगस्ट २०२२ या काळात देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त हर घर तिरंगा अभियान मोठया प्रमाणावर राबविण्यात आला. या अभियानाअंतर्गत जिल्हा प्रशासनाने विविध शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून जिल्हयाभरात हा उपक्रम राबविला या उपक्रमाअंतर्गत घरावर लावण्यात येणाऱ्या राष्ट्रध्वजासाठी केंद्र शासनाच्या वतीने आचारसंहिता ठरवून दिली होती व ही आचारसंहिता तंतोतंत पाळण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनावर होती, परंतु दुर्दैवाने जिल्हयाभरामध्ये या आचारसंहितेचे पालन झाले नाही. हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत घरावर राष्ट्रध्वज लावणे अपेक्षित असले तरीही जिल्हयाभरामध्ये घरासोबतच अनेक उत्साही नागरिकांनी दोन चाकी व चार चाकी वाहनांवर देखील राष्ट्रध्वज लावले ते राष्ट्रध्वज आजही वाहनांवर त्याच स्थितीत आहेत हे नियमाचे उल्लंघन करणारे आहे. 

दि. १३ ऑगस्ट २०२२ ते १५ ऑगस्ट २०२२ दरम्यान झालेल्या हर घर तिरंगा अभियानानुसार १५ ऑगस्ट २०२२ रोजी संध्याकाळी सर्व घरांवरील राष्ट्रध्वज सन्मानाने उतरविणे व ते सुरक्षित व सन्मानपूर्वक योग्य जागी ठेवणे आवश्यक होते परंतु अभियान समाप्तीच्या पाच दिवसानंतरही म्हणजेच आज दि. २० ऑगस्ट २०२२ रोजी अनेक इमारतींवर, घरांवर , दुकानांवर , छोट्या मोठ्या व्यवसायिक टपऱ्यांवर व लहान मोठ्या वाहनांवर राष्ट्रध्वज असल्याचे दिसुन येते या ठिकाणी लावलेले राष्ट्रध्वज योग्य स्थितीत नसून काही ठिकाणी राष्ट्रध्वज झुकलेले अवस्थेत असून काही ठिकाणी फाटलेले पण आहेत राष्ट्रध्वजाचा या पद्धतीचा अवमान ही अत्यंत गंभीर व राष्ट्रध्वजाच्या सन्मानाला डाग लावणारी घटना आहे.

हर घर तिरंगा अभियानात ज्या पद्धतीने उत्साहात व तत्परतेने जिल्हा प्रशासनाने विविध यंत्रणांमार्फत काम केले त्याच पद्धतीने अभियानाचा कालावधी संपल्यानंतरही विविध ठिकाणी लावण्यात आलेले राष्ट्रध्वज प्रशासनामार्फत सन्मानाने उतरविण्यात यावे व राष्ट्रध्वजाचा होत असलेला अवमान तात्काळ थांबवावा या मागणीचे निवेदन आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी परभणी यांना निवेदनाद्वारे करण्यात आले मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार श्री वाकोडकर यांना देण्यात आले. 

निवेदनावर प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, युवा आघाडी जिल्हाप्रमुख गजानन चोपडे, शेतकरी आघाडी तालुकाप्रमुख सय्यद मुस्तफा, शहर प्रमुख धर्मेंद्र तूपसमुद्रे, शहरचिटणीस वैभव संघई, शेख बशीर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या