💥दैनिक लोकमतच्या माध्यमातून लोकमताशी बांधिलकी जोपासनारा मराठवाड्यातील पत्रकाररूपी कोहिनूर हिरा हरपला...!


💥ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत भराडे यांचे वयाच्या ६७ व्या वर्षी दुःखद  निधन💥

परभणी (दि.०२ आगस्ट) - दैनिक लोकमत वृत्तपत्राच्या माध्यमातून लोकमताशी बांधिलकी जोपासनारा मराठवाड्यातील पत्रकाररूपी कोहिनूर हिरा आज हरपला....ज्येष्ठ पत्रकार तथा दैनिक लोकमत या आघाडीच्या वर्तमान पत्राचे वरिष्ठ उपसंपादक श्रीकांत भराडे यांचे आज मंगळवार दि.०२ आगस्ट २०२२ रोजी औरंगाबाद येथील खाजगी रूग्णालयात दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६७ वर्षाचे होते. 

 परभणी येथील मुळचे रहिवासी असलेले श्रीकांत भराडे हे शांत, संयमी,एक अत्यंत अभ्यासू,संवेदनशील पत्रकार म्हणूण ओळखले जात होते आपल्या पत्रकारितेचा दिर्घकाळ त्यांनी दैनिक 'लोकमत'मध्ये वरिष्ठ उपसंपादक म्हणूण घालवला. परभणी येथील त्यांची कारकीर्द सर्वांच्या स्मरणात राहील अशी होती. त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण विषयांना वाचा फोडली. पत्रकारीते सोबतच संवेदनशील लेखक म्हणून भराडे सर्वपरिचित होते. 'दटके बोलो' ही त्यांची कादंबरी प्रसिद्ध आहे. त्यांनी कविता व ललित लेखनही केले

भराडे यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, बहिणी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. दरम्यान उद्या बुधवार दि.०३ आगस्ट २०२२ रोजी दुपारी ०१-०० वाजता परभणीतील खंडोबा बाजार स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या