💥ग्रामीण भागातील निर्भिड जनहीतवादी पत्रकारीता श्राप की सामाजिक बांधिलकीचे वरदान ?

 


💥लोकशाहीच्या चौथ्या आधारस्तंभ उध्वस्त करण्याचे कुटील कारस्थान शेवटी थांबणार तरी केव्हा ?💥

✍🏻परखड सत्य (भाग क्र.१) चौधरी दिनेश (रणजीत)

" सत्याच्या मार्गावर मार्गक्रमण करीत जनशसामान्यांना न्याय मिळवून देण्याचा निर्मळ हेतू नजरेसमोर ठेवून परखड जनहीतवादी  लिखाण करीत स्वतःसह स्वतःच्या कुटुंबाच्या भविष्याकडे दुर्लक्ष करीत दिव्या प्रमाने स्वतःच्या कुटुंबाच्या अपेक्षांना अक्षरशः आग लावून 'दिव्या खाली अंधार असल्यागत' आम्ही ग्रामीण भागातील पत्रकार इतरांच्या आयुष्यातील अंधार दुर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत असतांना आम्हाला याचे सुध्दा भान नसते की आम्ही इतरांना न्याय मिळवून देण्यात बेभान होऊन स्वतःच्या स्वार्थापोटी लोकशाहीच्या मुळावर घाव घालणाऱ्या मनुष्यरूपी शैतानी प्रवृत्तीच्या शत्रूंची एक मोठी फौज निर्माण करीत स्वतःसह स्वतःच्या कुटुंबाच्या जिवनात भयंकर अंधाराला निमंत्रण देत आहोत याची देखील आम्हाला कल्पना नसते " 

ग्रामीण भागातील पत्रकार जनहीताशी बांधिलकी जोपासत पत्रकारीता करीत असतांना विकासाच्या नावावर शासकीय विकासनिधीसह शासनाने सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी लागू केलेल्या विविध शासकीय योजनांची सोईस्कररित्या विल्हेवाट लावणाऱ्या भ्रष्ट लोकप्रतिनिधींसह भुखंड माफीया/गौण खनिज रेती माफिया/अवैध देशी विदेश दारू माफिया/अवैध विषारी तंबाखूजन्न पदार्थासह गुटखा नशिल्या पदार्थांचे तस्कर यांच्यासह समाजकंठकांच्या विरोधात कुठल्याही प्रकारची तडजोड न करता परखडपणे सत्य लिहिणाऱ्या पत्रकारांची मुस्कटदाबी करण्यासाठी व त्यांना कायमस्वरूपी अद्दल घडवण्यासाठी कलम ३६४ (अ) अंतर्गत संबंधित पत्रकाराने खंडनी मागीतल्याचा बनाव करून त्याला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा गंभीर प्रकार केला जातो तर भ्रष्ट अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या भ्रष्ट व लाचखोर कारभारा विरोधात जनहीताशी बांधिलकी जोपासत सत्याची कास धरून परखडपणे लिखाण केल्यास किंवा शासकीय विकासनिधी शासकीय योजनांची माहिती मागण्याचा प्रयत्न केल्यास त्या पत्रकारा विरोधात शासकीय कामात अर्थळा निर्माण केल्या प्रकरणी कलम ३५३ अंतर्गत खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकारही घडत असल्याचे पाहावयास मिळतात अन् याही पेक्षा गंभीर बाब म्हणजे शेवटी पत्रकार आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहून काही केल्या दबत नसल्यास मग एखाद्या चारित्र्यहीन महिलेला हाताशी धरून विनंयभंग केला म्हणून कलम ३५४ अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यास देखील ही मनुष्य रुपातील शैतानी प्रवृत्ती मागेपुढे पाहत नाही पत्रकारांवर दाखल होणाऱ्या खोट्या गुन्ह्यात अधिकारी/कर्मचाऱ्यांकडून ना सत्यतेची पडताळनी ना कुठलाही सखोल तपास अगदी नियोजनबध्द पध्दतीने 'साम दाम दंड भेद' आदी चतुर्थ मार्गांचा अवलंब करीत भ्रष्ट बेईमान लोकप्रतिनिधी समाजकंठक माफिया व त्यांच्या इशाऱ्यावर वाटेल त्याचे लचके तोडण्यास तयार असलेले गुंड प्रवृत्ती एकमेकांच्या गळ्यात गळे घालून लोकशाहीचा गळा घोटत लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ समजल्या जाणाऱ्या निष्पक्ष निर्भीड पत्रकारीतेची सोईस्कररित्या क्रुरपणे हत्या करण्याचा डाव आखतात असे करतांना या मनुष्यरुपी शैतानांचे यत्किंचितही हात कापत नाहीत. 

💥जनसामान्यांच्या न्याय हक्कासाठी वास्तववादी लिखाण करणारा पत्रकार शेवटी सर्वांकडूनच उपेक्षित :-

सर्वसामान्य जनतेला शासकीय प्रशासकीय पातळीवर सहजा सहजी न्याय मिळत नाही अश्या वेळेला न्यायाची अपेक्षा घेऊन शेवटचा पर्याय म्हणून संबंधित उपेक्षित व्यक्ती सरळ पत्रकाराला न्याय मिळवून देण्यासाठी साकडे घालत असते अश्या उपेक्षितांना न्याय मिळवून देण्यासाठी परखडपणे लेखणी झिजवणाऱ्या त्या पत्रकाराला याचे सुध्दा भान नसते की आपण ज्याच्या विरोधात सत्याची कास धरून परखडपणे लिखाण करीत आहोत ती अत्याचारी प्रवृत्ती तत्वभ्रष्ट राजकारणी आहे की भ्रष्ट शासकीय अधिकारी/कर्मचारी आहे की माफिया समाजकंठक गुंड प्रवृत्ती त्या पत्रकाराचा एकमेव मुळ उद्देश हाच असतो की आपल्या परखड लिखाणातून त्या अन्यायग्रस्ताला न्याय मिळावा यापेक्षा जास्त त्याला कुठल्याही प्रकारची त्या पत्रकाराला अपेक्षा नसते आपल्यामुळे ज्या अन्यायग्रस्त व्यक्तीला न्याय मिळाला त्याच्या चेहऱ्यावरील समाधानच त्या पत्रकाराच्या जनहीतवादी पत्रकारीतेचा मोबदला असतो....स्वतःसह कुटुंबाच्या आर्थिक विकासाचा मुळ उद्देश डोळ्यासमोर ठेवून जनहिताच्या नावावर केलेल्या शासकीय विकास कामांसह प्रत्येक कामांचे फळ मिळण्याची अपेक्षा केवळ भ्रष्ट लोकप्रतिनिधी/भ्रष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांना असते परंतु भ्रष्ट पुढारी भ्रष्ट नौकरशहांकडून अपेक्षा भंग झालेला व समाजकंठक माफिया गुंडप्रवृत्तींकडून सातत्याने अन्याय झालेला सर्वसामान्य मनुष्य जेव्हा न्यायाच्या अपेक्षेने शेवटचा पर्याय म्हणून एखाद्या निर्भिड पत्रकाराकडे मोठ्या आशेने येतो तेव्हा त्या पत्रकाराकडून न्याय मिळाल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावरील समाधानच त्या पत्रकाराच्या कामाची खरी पोहचपावती असते त्याला ना प्रसिध्दीची हाव असते ना पैशाची..अरे यालाच तर निस्वार्थ निर्भिड जनहीतवादी पत्रकारीता म्हणतात  अश्या प्रकारची जनहीतवादी पत्रकारीता करणारा पत्रकारच प्रत्येक भ्रष्ट बेईमानांच्या डोळ्यात सलत असतो अन् मग सुरूवात होते भयंकर सुडसत्राला.

💥ग्रामीण भागात पत्रकारांवर अगदी राजरोसपणे होतात जिवघेणे हल्ले :-

ग्रामीण भागात निस्वार्थपणे पत्रकारीता करीत सर्वसामान्य जनता शेतकरी कष्टकरी मजुरांना न्याय मिळावा या उद्देशाने परखडपणे लेखणी चालवणाऱ्या पत्रकारांना वेळोवेळी भ्रष्ट लोकप्रतिनिधी/अवैध व्यवसायिक तसेच माफियाशाहीच्या रोशाला बळी पडावे लागते विरोधात बातमी का लिहिणी या कारणामुळे हल्ले तर होतातच याही पेक्षा हास्यास्पद बाब म्हणजे बातमीत नाव टाकले नाही या कारणामुळे देखील त्या पत्रकाराला अपमानास्पद वागणूकीसह मारहाणीला देखील सामोरे जावे लागते असाच एक प्रकार नुकताच अवघ्या तिन दिवसापुर्वी पुर्णा तालुक्यातील ताडकळस पोलिस स्थानकाच्या हद्दीतील माखणी गावात घडला येथील दैनिक सामना या वर्तमानपत्राचे प्रतिनिधी जनार्धन आवरगंड यांनी माखणी गावाचा ओल्या दुष्काळा संदर्भातील अहवाल निरंकआल्याची चर्चा गावात का केली त्यामुळे आमची बदणामी झाली असे म्हणून या गावाच्या मुजोर सरपंचाने त्या पत्रकाराला गावातील सार्वजनिक ठिकाणी मारहाण केली अन् यानंतर झालेल्या प्रकरणावर संबंधित पत्रकाराला माफी मागण्या ऐवजी उलट त्या पत्रकारावरच खंडणी मागीतल्याचा बिनबुडाचा आरोप वारे...लोकशाही लोकशाहीचे ठोकशाहीत रुपांतर करण्याचा हा गंभीर प्रकार ग्रामीण भागात सर्रास पाहावयास मिळतो सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा या दृष्टीने सातत्याने दिवसरात्र स्वतःच्या कुटुंबाची स्वतःच्या तब्बेतीची यत्किंचितही काळजी नकरता 'बिन पगारी फुल्ल अधिकारी बनून' सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी प्रशासनाला जागृत करण्यासाठी सामाजिक विषमता दुर करण्यासाठी राष्ट्रीय एकात्मता अबाधित ठेवण्यासाठी सातत्याने आपली लेखणी झिजवणारा पत्रकार प्रशासनातील काही भ्रष्टाचाऱ्यांसह शासकीय विकासनिसह विविध जनहीतकारी शासकीय योजनांची सोईस्कररित्या विल्हेवाट लावणाऱ्या भ्रष्ट लोकप्रतिनिधींसह अवैध धंद्यांना आपल्या व्यवसायाचे साधन बनवणाऱ्या तस्कर माफिया समाजकंठक गुंडांसह त्यांनी पोसलेल्या चाटुकारांच्या देखील डोळ्यात खुपतो जनहीतवादी पत्रकाराचा छळ करण्याचे प्रकार सातत्याने होत असतात प्रत्येक रोज एखाद्या तळीरामाला पाठवून त्या पत्रकाराशी धक्काबुक्की शिवीगाळ हा तर नित्यनेमच असतो पत्रकारांच्या सत्याच्या बाजूने परखडपणे चालणाऱ्या लेखणीवर घाव घालीत लोकशाहीच्या चौथा आधारस्तंभ उध्वस्त करण्याचा हा गंभीर प्रकार होत असतांना प्रशासन ही हल्लेखोरांना सातत्याने पाठीशी घालीत असल्याचा गंभीर प्रकार सातत्याने होतांना दिसत असून यापुर्वी देखील पुर्णा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात पत्रकारांवर जिवघेणे हल्ले झालेले आहेत त्यामुळे एकंदर परिस्थितीचा विचार केल्यास असा प्रश्न उपस्थित होतो की ग्रामीण भागातील निर्भिड जनहीतवादी पत्रकारीता जनहीतवादी पत्रकारांसाठी श्राप आहे की सामाजिक बांधिलकीचे वरदान ? जनहीताशी बांधिलकी जोपासत आपले संपूर्ण जिवण सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी आपल्या लेखणीची धार तळपत ठेवणाऱ्या पत्रकारांनी शेवटी अन्याय सहन तरी करायचा कुठवर ? असा गंभीर प्रश्न उपस्थित करणाऱ्या गंभीर घटना जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात घडत असतांना सत्तेची सुत्र हलवणारे सत्ताधारी ठोस पावल उचलण्याऐवजी हल्लेखोरांनाच जर खंबीर पाठींबा देऊ लागले तर लोकशाहीची हत्या होणार नाही काय ?

जिल्ह्यात सर्वसामान्य जनता,शेतकरी शेतमजूर गोरगरीब एससी/एसटी मागासवर्गीय अल्पसंख्यांकांच्या न्याय-हक्कासाठी संघर्ष करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांच्या न्याय हक्कासाठी परखडपणे लेखणी झिजवणाऱ्या पत्रकारांना खंबीर पाठबळ देण्याऐवजी त्यांच्या हक्कावर गधा आणून त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबाला देखील लक्ष बनवले जाण्याचा गंभीर प्रकार पुर्णा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात होतांना दिसत असून सर्वसामान्य जनतेला त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवणाऱ्या भ्रष्ट बेईमानांसह पत्रकारांवर हल्ले करणाऱ्या हल्लेखोर व गुन्हेगारी प्रवृत्तीला सातत्याने पाठबळ मिळत असल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात भयावह अराजक परिस्थिती निर्माण होतांना पाहावयास मिळत आहे.......

✍🏻परखड सत्य (भाग क्र.१) : चौधरी दिनेश (रणजीत)






टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

  1. नमस्कार , ग्रामीण पत्रकाराची व्यथा आपण मांडली ती मला अत्यंत आवडली.मी सुधा भोकर जी.नांदेड येथून पत्रकार आहे , मागील 23 वर्षांपासून मी या क्षेत्रात आहे.अनेक वर्तमान पत्रात कामे करून आता स्वताच पोर्टल चा संपादक आहे. नांदेड येथून स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठातून MJ झालेले आहे.असे असूनही मी जिथल्या तिथेच आहे.सरकार अजून पदवीधारक पत्रकारांना मानधन चालू केले नाही, ही खेदाची बाब आहे. शासनाने लवकर मानधन चालू करावे या साठी लिखाण करावे.हीच सदिच्छा 💐
    - आपलाच एक लेखणी बांधव पत्रकार रमेश जी. गंगासागरे भोकर जी.नांदेड 9850552488

    उत्तर द्याहटवा