💥परळी पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांकडून दलित वस्ती सुधार योजनेच्या कामाचा माहितीचा फलक लावण्यास टाळाटाळ...!


💥दलित वस्ती सुधार योजनेच्या कामाच्या माहितीचा फलक तात्काळ लावा - बालासाहेब जगतकर.                                           

परळी (दि.२६ आगस्ट) - परळी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्याकडून दलित वस्तीच्या कामाची व सदरील कामावरील फलक लावण्याची माहिती देण्यास टाळताळ करीत असल्याची माहिती साप्ताहिक मानपत्र चे संपादक तथा वंचित  बहुजन आघाडीचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख तथा अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जगतकर यांनी दिली आहे.                                                 

याबाबत सविस्तर माहिती अशी की राज्यात शासनाने दलितांच्या वस्तीचा विकास व्हावा व त्यांचे जीवनमान उंचावे म्हणून दरवर्षी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीच्या विकास या योजनेअंतर्गत निधी दिला जातो व तो निधी फक्त दलित वस्तितच वापर करावा लागतो. परंतु असे होताना दिसत नसल्याकारणाने आम्ही परळी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना सदरील योजने अंतर्गत केलेल्या कामाची माहिती एकूण आलेला निधी एकूण वापर झालेला निधीची माहिती व त्यावरील फलकाची माहिती देण्यात यावी असे लेखी निवेदन दिनांक चोवीस पाच दोन हजार बावीस रोजी दिले असता त्यांनी कुठल्याच प्रकारची दखल न घेतल्यामुळे आम्ही जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावाने दिनांक 15 /6 /2022 रोजी पंचायत समितीला दिलेल्या निवेदनाच्या प्रति सह लेखी निवेदन दिले असता त्यांनीही कुठल्याही प्रकारची दखल न घेता समाज कल्याण कार्यालय बीड यांच्याकडे अर्ज वर्ग केला असून संबंधित समाज कल्याण कार्यालयाने ही कुठल्याच प्रकारची दखल आजपर्यंत घेतली नसून संबंधित वरिष्ठ अधिकारी हे पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांची पाठराखण करून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकावर अन्याय करीत असल्याचा आरोप साप्ताहिक मानपत्रचे संपादक तथा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख तथा अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाचे जिल्हाध्यक्ष बालासाहेब जगतकर यांनी केला असून लवकरच आम्ही औरंगाबाद येथील आयुक्त कार्यालयात दाद मागणार असल्याची माहिती ही प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या