💥परभणी जिल्ह्यातील विविध गावातील ग्रामपंचायतमध्ये हर घर तिरंगा जनजागृती कार्यक्रम संपन्न....!


💥भारत स्वतंत्र्याबद्दल विद्यार्थ्यांनी भाषणे सादर केली💥


परभणी (दि.8 आगस्ट) : मानवत तालुक्यातील कोल्हा येथे भारत अमृतमहोत्सव कार्याक्रमाअंतर्गत हरघर तिरंगा या संदर्भात सोमवार दि. ८ऑगस्ट  रोजी ग्रामसभा ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित केली होती. यात जिल्हा परिषद शाळेतील शंभराहून जास्त विद्यार्थी सहभागी होवून क्रांतिकारक, समाजसेवक, आर्मी, यांच्या वेशभूषा परिधान करून भारत स्वतंत्र्याबद्दल विद्यार्थ्यांनी भाषणे सादर केली.


        कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच सोजरबाई गायकवाड या होत्या तर प्रास्ताविक ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर भिसे यांनी केले. यावेळी  उपसरपंच नारायण भिसे, सदस्य शंकर भिसे, रामचंद्र गायकवाड, राजेश दहिवाल, मुख्याधापक श्री.तोष्णीवाल, दिलीप रेंगे, सखाराम भिसे, भारत काकडे,  दतराव राऊत, माणिक तारे, प्रल्हाद ढाकरगे, अंगणवाडीच्या इंदुमती तारे, प्रमिला काळे, जयश्री राऊत,संगीता चतुर, नासेर शेख, ग्रामसेवक श्री. टोंपे यांनी तिरंगा ध्वज १३ ते १५ ऑगस्ट रोजी घरावर व कार्यालयात कसे लावायचे याबाबत सविस्तर माहिती दिली तर प्रमोद तारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.


*हर घर तिरंगा मोहीम पंचायत समिती परभणी गटविकास अधिकारी शिवाजीराव कांबळे यांची दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीला मुलाखत*

परभणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी  शिवाजीराव कांबळे यांनी तालुक्यातील मुरुंबा येथे  दि. 8 ऑगस्ट 2022 रोजी ग्रामसभेला मार्गदर्शन केले आणि एलईडी व्हॅनबाबत नागरिकांना माहिती दिली. यावेळी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीला गटविकास अधिकारी श्री कांबळे यांनी मुलाखत दिली. यामध्ये परभणी पंचायत समिती मार्फत "हर घर तिरंगा" विषयी प्रत्येक गावात ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले असून ग्रामसभेत "हर घर तिरंगा" बाबत माहिती देण्यात येत आहे. असे सांगितले. तसेच ग्रामपंचायतीने तिरंगा ध्वज खरेदी केले असून ते नागरिकांपर्यंत पोहोचवत जात आहेत. तिरंगा झेंड्याबरोबर एक ध्वज संहिता पॉम्प्लेट स्वरूपात देण्यात येत आहे यात दि. 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत ध्वज कसा लावला पाहिजे याबद्दल माहिती देण्यात आली आहे. 

        तसेच हर तिरंगा मोहिमेअंतर्गत प्रचार प्रसिद्धीपर एल इ डी व्हॅन तालुक्यातील गावोगावी फिरत असून हर घर तिरंगाविषयी मार्गदर्शन करत आहे. यावेळी गट विकास अधिकारी श्री शिवाजी कांबळे यांनी दूरदर्शनच्या सहयाद्री वाहिनीला बोलतांना माहिती दिली आहे.

* फुलकळस येथे जनजागृती :-

            फुलकळस येथे आज स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रतेक घरी तिरंगा उभारण्यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी विशेष ग्रामसभा घेण्यात आली यावेळी महापुरुषाच्या वेशभूषेत जि.प.कें.प्रा. आदर्श शाळेचे विद्यार्थी, ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी, कर्मचारी, शिक्षक वर्ग, अंगणवाडीताई, आशाताई, महीला गटाच्या ताई व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

*जिल्हा परिषद केद्रिय प्राथमिक शाळा लोहगाव येथे ग्रामसभा :-

             स्वातंत्र्याचा अम्रत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा उपक्रम राबविण्याबाबत ग्रामसभा दि.08ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10 वाजता जि.प.के.प्रा.शाळा लोहगाव ता.जि.परभणी येथे ग्रामसभा सरपंच अमोल पांडुरंग  जुकटे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. 

            ग्रामसभेत हर घर तिरंगा उपक्रम राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली. ग्रामसभेत हर घर तिरंगा, बालविवाह प्रतिबंधक कायदा सन 2006 बाबत ग्राम विकास अधिकारी  डी.टी.दुधाटे यांनी सविस्तर माहिती दिली.

         महापुरुष अवतरले ग्रामसभेला या प्रमाणे शालेय विद्यार्थ्यांना भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महापुरुषांच्या वेशभूषेत ग्रामसभेमध्ये महापुरुषांच्या वेशभूषेत महापुरुषांचे विचार मांडले. जि.प.के.प्रा.शा. उर्दु माध्यम शाळेतील विद्यार्थ्यांनी सादरीकरण यशस्वी  केले. सर्व शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खुप मेहनत घेतली आहे. यामध्ये  बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 बाबत चर्चा करण्यात आली.  ग्रामसभेत सरपंच अमोल जुकटे, ग्राम विकास अधिकारी डी.टी.दुधाटे, ग्रामपंचायत सदस्य पप्पु इनामदार, राजु पोवळे, अशोक दिवसे, कैलास हजारे पोलिस पाटील संजय कनसटवाड, वैद्यकीय अधिकारी डॉ.विकास भगत , केंद्र प्रमुख बालासाहेब सिताफळ, मुख्याध्यापक श्रीमती बी.ए समद ,बी.बी.मुळे, वैजनाथ लटपटे, भास्कर वाघ,मदरेवार, श्री. देशमुख , अंगणवाडी सेविका वनिता कदम, रंजना भोसले, पार्वती पापुलवाड, संगिता घोडके,वंदना जाधव, सुरेखा सोनटक्के, आरोग्य सेविका सारिता घाटोळकर, ज्योती नळदकर, सचिन देशमुख, ग्रामपंचायत कर्मचारी विजय देशमुख, रमेश राऊत, अशोक तिडके आदीसह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

*सावंगी जनजागृती  ग्रामसभा :-

            सावंगी (म्हा) हर घर तिरंगा बाबत जनजागृती  ग्रामसभा तसेच स्वातंत्र्य सैनिकांची आठवण जागृत ठेवण्यासाठी महापुरुष यांचे  वेषभूष धारण करून त्याचे विचार मांडताना शाळेतील विध्यार्थी यावेळी सरपंच श्री संदीप भाऊ चव्हाण ,ग्रामपंचायत सदस्य ,अंगणवाडी ताई ,बचत गट तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थिती होती.

-*-*-*-*-

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या