💥आमदार अंबादास दानवे यांना मिळाले निष्ठेचे फळ ; अंबादास दानवे यांची विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती....!


💥शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी आ.दानवे यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्ष पदासाठी निवड झाल्याची माहिती दिली💥

 ✍️ मोहन चौकेकर

 शिवसेनेला विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेता म्हणून अधिकृत मान्यता देण्यात आली आहे. शिवसेनेकडून विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांची नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाकडून त्याबाबात अधिसूचना काढण्यात आली आहे.

दरम्यान, शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी सोमवारी अंबादास दानवे यांची विधान परिषदेच्या विरोधी पक्ष पदासाठी निवड करण्यात आल्याची माहिती दिली होती. त्यावर आज अधिकृत शिक्कामोर्तब झालं आहे. अरविंद सावंत सांगितले होते की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार विधान परिषदेच्या विरोधी पक्ष पदावर शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांची नियुक्ती करावी अशा प्रकारची शिफारस उपसभापती निलम गोऱ्हे यांच्याकडे केली आहे. . त्यास उपसभापती निलम गोऱ्हे यांनी मान्यता दिली व त्यानुसार विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी अंबादास दानवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार पडल्यानंतर औरंगाबाद जिल्ह्यातील सहा आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटांमध्ये सामिल झाले होते. मात्र औरंगाबाद जिल्ह्यातील  अंबादास दानवे हे एकमेव आमदार उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिले होते.  त्यामुळे त्यांना या निष्ठेचे फळ विधानपरिषदेच्या विरोधीपक्षनेते नियुक्तीचे मिळाले आहे.आमदार अंबादास दानवे हे शिवसेनेचे प्रवक्ते देखील आहेत. गेल्या १८ वर्षा पासुन ते औरंगाबाद जिल्हाचे शिवसेना जिल्हाप्रमुख काम करत आहेत व शिवसेनेचे एक आक्रमक नेते म्हणून त्यांची ओळख आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेतील पक्षीय बलाबल काय ?

78 सदस्यीय महाराष्ट्र विधानपरिषदेत भाजपचे 24 सदस्य आहेत. शिवसेनेचे 12 तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे प्रत्येकी 10 - 10 सदस्य आहेत. लोक भारती, पीजेंट्स एंड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांचा प्रत्येकी एक एक सदस्य आहे. तर चार अपक्ष सदस्य आहेत. 15 जागा खाली आहेत.....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या