💥आमदार संतोष बांगर पुन्हा निवडून आल्यास मी माझी सर्व संपत्ती दान करेन - दिलीप घुगे


💥हिंगोली येथील युवासेना कार्यकर्ते दिलीप घुगे यांनी आमदार संतोष बांगर यांना निवडणुकीचं दिल आव्हान💥

शिवशंकर निरगुडे - हिंगोली 

हिंगोली - राज्यातील सत्तांतराच्या घटनेवेळी शिंदे गटाचे काही आमदार चांगलेच चर्चेत आले. त्यामध्ये, सांगलीचे आमदार शहाजीबापू पाटील आणि हिंगोलीचे आमदार संतोष बांगर हे लोकांच्या अधिक लक्षात राहिले. कारण, संतोष बांगर हे अगोदर रडले होते, शिंदे गटाच्या आमदारांना त्यांनी एकप्रकारे शाप दिला होता. मात्र, अखेर तेच शिंदेगटात सहभागी झाले. त्यामुळे, संतोष बांगर चांगलेच चर्चेत आले. काही दिवसांपूर्वी त्यांनी एका कँटीन व्यवस्थापकाला कानाखालीही लगावली होती. त्यावरुन ते चर्चेत असतानाच, युवासेनेच्या एका कार्यकर्त्याने त्यांना चॅलेंजच केलं आहे.

हिंगोलीतील युवासेनेचे कार्यकर्ता असलेल्या दिलीप घुगे यांनी आमदार संतोष बांगर यांना निवडणुकीचं आव्हान दिलं आहे. 'माझं आव्हान आहे की, संतोष बांगर यांच्यात हिंमत असेल, तर त्यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणुकांना सामोरं जावं. पण, त्यांच्यात हिंमत नाही. भविष्यात जेव्हा केव्हा पुढची निवडणूक लागेल, तेव्हा त्यांनी पुन्हा निवडून येऊन दाखवावं. जर ते निवडून आले, तर माझी वडिलोपार्जित प्रॉपर्टी आणि मी कमावलेली सगळी प्रॉपर्टी मी दान करायला तयार आहे, असं चॅलेंजच घुगे यांनी दिलं आहे. दरम्यान, तसं झाल्यास मी भिक्षा मागून खाईन, असेही कार्यकर्ता घुगे यांनी म्हटले आहे 

हिंगोलीत शिंदे गटाचा ना आमदार निवडून येईल, ना खासदार असा दावाही त्यांनी केला आहे. येथील खासदार देखील पुन्हा निवडून येऊ शकत नाहीत, जर बंडखोर गटातील खासदार पुन्हा निवडून आले, तर माझ्या जिल्ह्यातल्या शिवसैनिकांकडून मी एकेक रुपया जमा करेन आणि १ लाख लिटर दुधाचा अभिषेक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना करेन, असं चॅलेंज घुगे यांनी बांगर यांना केलं आहे. तसेच, सध्या तुमची सत्ता आहे, ती जास्त डोक्यात जाऊ देऊ नका. लोकांची विकासकामं करा. गरीबांना मदत करा, असा उपरोधात्मक सल्लाही दिला......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या