💥देशाची फाळणी दुखद व भयावह घटना - अशोकजी माटंरा


💥विभीषिका स्मृती दिवसानिमित्त चित्र प्रदर्शनी उद्घाटन प्रसंगी त्यांनी आपले विचार व्यक्त केले💥


परभणी,(दि.14 आगस्ट) : 14 ऑगस्ट हा दिवस ‘फाळणी दिन’ म्हणून स्मरणात ठेवला जाणार आहे. देशाची फाळणी दुखद व भयावह घटना असून त्याचे परिणाम आजही आपणांस दिसून येत असल्याचे प्रतिपादन अशोकजी माटरा यांनी केले.

अग्रणी बँक व भारतीय स्टेट बँक ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्था, परभणी यांच्या संयुक्त विद्यमानाने येथील आरसेटी कार्यालयात विभाजन विभीषिका स्मृती दिवसानिमित्त चित्र प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अशोकजी माटरा, भास्करराव ब्राह्मनाथकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव, सूचना अधिकारी सुनील पोट्टेकर यांची उपस्थिती होती.


यावेळी श्री. माटराजी फाळणी नंतरच्या वेदना मांडताना म्हणाले की, सिंधी समाजानी फाळणी नंतर संपूर्ण भारत भर विखरून, फाळणी नंतर जी बिकट परिस्थिती त्यांच्यावर निर्माण झाली होती त्यास लढा देऊन आज तो समाज सर्वांमध्ये कसा प्रगतशील झाला हे सांगितले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व वक्ते आणि इतिहासकार भास्करराव ब्रह्मनाथकर यांनी त्यावेळेसचा अखंड भारत हा  "सोने की चिडिया" होता, आणि आता तो फाळणी नंतर परिपूर्ण नसून अर्धवट आहे असे सांगितले. फाळणीनंतरची खरी वेदना हीच होय असे ते म्हणाले.
श्री. सुनील पोट्टेकर यांनी यावेळी फाळणी नंतरच्या काही ऐतिहासिक घटना सांगितल्या. कार्यक्रमाचे मुख्य व्यवस्थापक अग्रणी बँकेचे अधिकारी सुनील हट्टेकरजी यांनी "आजादीचा 75 व्या अमृत महोत्सव कार्यक्रमाचे निमित्य साधून अखंड भारत दिवस व फाळणीच्या वेदना कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सांगुन आभार मानले.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन आरसेटी फॅकल्टी श्रीमती मनीषा कदम यांनी केले व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंगेश कोमटवार, रवि भालेराव, संभाजी हनवते व सुरेश उबाळे यांनी सहकार्य केले......
****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या