💥पुर्णा येथील स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात क्रांतीसिंह नाना पाटील यांची जयंती उत्साहात साजरी...!


💥याप्रसंगी प्र.प्राचार्य डॉ.संतोष कुऱ्हे क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले💥

पूर्णा (दि.०३ आगस्ट) - येथील स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी   पवार महाविद्यालयात देशाच्या स्वातंत्र्यासाठी आहोरात्र अथक परिश्रमातून प्रतीसरकार स्थापन करून आपली राष्ट्रनिष्ठा सिद्ध करणारे महान देशभक्त क्रांतीसिंह नाना पाटील यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.संतोष कुऱ्हे  यांनी  क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र  अभिवादन केले.तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक,कर्मचारी व विद्यार्थी यांनीही क्रांतीसिंह नाना पाटील  यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. जगन्नाथ टोंपे यांनी केले तर आभार महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण संचालक प्रा.डॉ भारत चापके यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक,कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या