💥परभणी येथे आजादी का अमृत महोत्सवा निमीत्त मोटर सायकल रॅली....!


💥भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन 15 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वाजता करण्यात आले आयोजन💥

 परभणी (दि.12 आगस्ट) :- स्वांतत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन 15 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता करण्यात आले असून त्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातून होणार आहे. सदरील मार्ग - जिल्हाधिकारी कार्यालय, रेल्व स्टेशन, उड्डाण पुलाच्या डाव्या बाजुने, जिंतुर रोड, तुराबुलहक्क कमानीच्या आतु , तुराबुल हक्क  दर्गाह, उत्तरेकडच्या रस्त्याने जुना पेडगाव रोड, जिंतुर नाका (महाराणा प्रताप चौक) जिंतुर रोड मार्गे विसावा फाटा (पाथरी चौक) येथून वळसा घेत जेल कॉर्नर जेल रोड, शनिमंदीर, आपना कॉर्नर, खंडोबा बाजार, अहिल्यादेवी चौक, गुलशना बाग, सुपर मार्केट, उघडा महादेव, दक्षिण रोडने 100 फुटी रोडने, संत गाडगे बाबा चौक ते डाव्या रोडने खानापुर फाटा परत वसमत रोडने विद्यापीठ गेट , छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्या जवळील जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयात समारोप होणार आहे. तरी सदर मोटर सायकल रॅलीमध्ये परभणी जिल्ह्यातील जास्तीत जास्त क्रीडा प्रेमी नागरिकांनी सहभाग घ्यावा. असे जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे. सदर मोटरसायकल रॅलीमध्ये जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, शिक्षणाधिकारी कार्यालय (माध्यमिक) शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि. प. परभणी, जिल्ह्यातील सर्व कार्यालये यांनी सदर रॅलीमध्ये सहभागी व्हावे. असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. सदर रॅलीमध्ये सहभागी सर्वांना प्रशासना तर्फे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सदर मोटरसायकल रॅलीस  जिल्हाधिकारी आंचल गोयल या हिरवा झेंडा दाखवुन मार्गस्थ करणार आहेत. तरी सर्व अधिकारी- कर्मचारी, व्यापारी तरी परभणीतील जास्तीत जास्त नागरिकांनी, खेळाडुनी, मुला- मुलींनी सहभाग घ्यावा. असे आवाहन मनपा आयुक्त देवीदास पवार यांनी केले आहे असे जिल्हा क्रीडा अधिकारी, परभणी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वार कळविले आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या