💥परभणीत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा क्रिडा अधिकारी व मनपाच्या वतीने सायकल रॅलीचे आयोजन...!


💥छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून दि.05 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 6.30 वा भव्य सायकल रॅलीला सुरूवात💥

परभणी (दि.03 आगस्ट) : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा क्रिडा अधिकारी व महानगरपालिका यांच्या वतीने दि.05 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 6.30 वा भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

            ही सायकल रॅली छत्रपती शिवाजी महाराज पुतळा- येथुन सोडण्यात येणार आहे. सायकल रॅली ही बसस्थानक-, उड्डाणपुल-, जिंतुर रोड-, दर्गा रोड कमान-, शासकीय दवाखाना-, शिवाजी चौक-, गांधी पार्क-, नारायणचाळ-, म.फुले पुतळा-, प्रशासकीय इमारत मार्ग वसमत रोड-, वसंतराव नाईक पुतळा-, विद्यापीठ गेट-, खानापुर फाटा-, मार्गे परत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे समारोप करण्यात येणार आहे. या सायकल रॅलीमध्ये परभणी जिल्ह्यातील जास्तीत जास्त क्रीडा प्रेमी नागरीक यांनी सहभाग घ्यावा. असे जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे. सदर सायकल रॅली मध्ये जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, शिक्षणाधिकारी कार्यालय (माध्यमिक) शिक्षणाधिकारी(प्राथमिक),जि. प. परभणी, जिल्ह्यातील सर्व कार्यालये यांनी सदर रॅलीमध्ये सहभागी व्हावे. असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. सदर रॅलीमध्ये सहभागी सर्वांना प्रशासना तर्फे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. सदर सायकल रॅलीस जिल्हाधिकारी आंचल गोयल  या हिरवा झेंडा दाखवुन सुरुवात करण्यात येणार आहे व कर्मचारी, व्यापारी तरी परभणीतील जास्तीत जास्त नागरिकांनी, खेळाडुनी , मुला- मुलींनी सहभाग घ्यावा. असे आवाहन आयुक्त मनपा देवीदास पवार,  व जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी केले आहे......


                                                                      

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या