💥नागपंचमी विशेष - आतापर्यंत एकही साप न मारणार हिंगोली जिल्ह्यात सेनगाव तालुक्यात एक छोटस कहाकर बुद्रुक गावं....!


💥आतापर्यंत हजारो सापांना जीवदान देणारा अवलिया💥

* शिवशंकर निरगुडे : हिंगोली 

हिंगोली - मराठवाड्यात हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात एक छोटस कहाकर बुद्रुक नावाचं गावं आहे. या गावची लोकसंख्या जवळपास दोन हजारच्या आसपास आहे. विदर्भ व मराठवाडा सीमेच्या जवळ असलेलं हे गाव आहे.गावांतील जमीन ही बारमाही ओलीताची असुन इथे नेहमी हिरवळ असते.तीनही ऋतू मध्ये शेतकरी शेतात पिक काढतात.हिरवळ आल्यामुळे या गावात सापांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.मात्र या गावातील एकही नागरीक सापाला मारत नाहिये.या गावकऱ्यांनी आत्तापर्यंत एक सुद्धा साप मारला नाही.


गावात उच्च शिक्षित असलेला डॉक्टर भास्कर विनायकराव पोपळघट या तरुणांनी सापाबद्दल गावकऱ्यांची भीती दूर केलीय व स्वतः साप पकडण्याचे प्रशिक्षण घेऊन आत्ता पर्यन्त तब्बल पाच हजार चे वर सापांना जीवदान दिलय. भास्कर पाटील हें  एक डॉक्टर असून ते १९९८  पासून वन्यजीव तसेंच सर्प रक्षणासाठी काम करतात जिल्ह्यातील कूठेही साप निघाल्यास ते त्वरित सर्वच कामे सोडून साप पकडण्यासाठी जातात व त्या सापाला जंगलात सुरक्षित पणे जंगलात सोडून देतात त्याच सोबत ते प्रत्येक व्यक्तीला सापा बद्दल माहिती सांगतात आज साप हा आपला शत्रू नसून मित्र आहे असे मार्गदर्शन करतात.

 आज मुक्या प्राण्यांना व सापांना वाचवण्याचा त्यांनी वसाच हाती घेतला आहे. त्यांच्या गावात कहाकर बुद्रुक गावात व तसेंच आजूबाजूच्या २० की .मि.परिसरात कोणीच सापाला मारत नाही कूठे जरी साप निघाला तर मला फोन लावा किंवा आपल्या परिसरातील सर्प मित्रांना बोलवा म्हंजे सापाचे प्राण वाचतील व सापामुळे जनतेलाही काही त्रास होणार नाही. 

डॉक्टर भास्कर पाटील यांनी पाच जयपूर येथील पाच मुलांना साप पकडण्याचे प्रशिक्षण दिले आहेत नवनाथ पारिसकर .शुभम पायघन .एकनाथ ढोले .विठ्ठल परिसकर. ज्ञानेश्वर पायघन हें पाच सेनगाव तालुक्यातील जयपूर येथील आहेत कूठेही साप निघाला की ते त्वरित साप पकडण्यासाठी जातात तेही निशुल्क आणि सापाला पकडून ते जंगलात सोडून देतात साप हा आपल्या शत्रू नसून मित्र आहे आत्ता पर्यन्त या पाच मुलांनी जवळपास १ हजार सापांना जिवन दान दिले आहे .

* साप आपल्या घराजवळ येऊ नये म्हणून काय कराल :-

घराजवळ पालापाचोळा साचू देऊ नका.भिंतीच्या भेगा व बिळे बुजवावीत.गोवय्रा व सरपणाची लाकडे घरापासून दूर व उंचावर ठेवावीत.शेतात किंवा घराबाहेर झोपताना शक्यतो जमिनीवर झोपू नये.कॉटचा पलंगाचा वापर करावा.खरकटे व कचरा घरापासून लांब अंतरावर टाकावा.पाळीव प्राणी,ससे,पोपट,कोंबड्या घरापासून दूर व उंचावर ठेवावेत.

* सापा विषय प्राथमिक माहिती :-

पर्यावरणामध्ये प्रत्येक गोष्टीला वेगळे महत्व आहे.आणि या महत्वपूर्ण गोष्टीमधील साप हा सुद्धा महत्वाचा घटक आहे.आता.साप हा प्रकार मानवाच्या मनात इतक्या खोलवर भिती निर्माण करून बसला आहे की,एखाद्या व्यक्तीला समजवणे फार कठीण होते.याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या पूर्वजांच्या काळात दवाखाने,हॉस्पीटल,डॉक्टर उपलब्ध नव्हते.जंगले मोठी व घनदाट होती.लोकवस्ती लहान व घरे साधी होती.रस्ते व पायवाटा तितक्याशा उपलब्ध नव्हत्या.यामुळे वन्यजीवांची प्रामुख्याने सापांच्या हालचाली जास्त होत होत्या.अशामुळे एखाद्या व्यक्तीला विषारी सर्पदंश झाला असावा.औषधोपचार उपलब्ध नसल्याने काही वेळात ती व्यक्ती मृत्यूमुखी पडली असावी.या घटनेमुळे तिथल्या लोकांमध्ये सापांविषयी भिती निर्माण झाली असावी व स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आपल्या पूर्वजांनी दिसेल तो साप मारायला सुरूवात केली असावी.पुढे पिढ्यान्‌पिढ्या हि गोष्ट पसरत जाऊन संपूर्ण भारतभर अशा गोष्टींचा प्रसार झाला.

* भारतामध्ये २७८ जातीचे साप सापडतात :-

यापैकी फक्त ७२ साप विषारी आहेत.महाराष्ट्रामध्ये ५२ जातीचे साप सापडतात त्यापैकी फक्त १० सापच विषारी आहेत.या १० सापांपैकी मानवाचा फक्त ४ विषारी सापांसोबत सामना होतो.बाकीचे ६ साप दूर्मिळ असून त्यातील २ साप महाराष्ट्राच्या समुद्रकिनारी तर ४  साप सह्याद्री पर्वतात सापडतात.पावसाळ्यामध्ये उंदिर,बेडूक,सरडे,पाली अशा प्राण्यांची संख्या व हालचाली वाढतात व हे प्राणी आपल्या घराजवळ येण्याची शक्यता असते.परिणामी साप या भक्ष्यावर आकर्षित होऊन आपल्या घरापर्यंत येतात.महाराष्ट्रामध्ये आढळणारे ५२ जातीच्या सापांपैकी ४२ साप बिनविषारी आहेत.या सापांमधील काही दुर्मिळ जातीचे साप जे दिसायला काहिसे विषारी सापांसारखे असतात.असे साप आपल्या घराजवळ येऊ शकतात.पण हे साप बिनविषारी असून या सापांपासून मानवाला काही अपाय नसतो.पण "सापांबद्दलची अनुवांशिक भिती,शास्त्रीय अज्ञान व माहितीचा अभाव" यामुळे लोक दिसेल तो साप मारून टाकतात.सापाला मारण्याची काहीच गरज नसते कारण साप कधीच मानवाला उगाच चावत नाही किंवा डूख धरत नाही किंवा मागावरही येत नाही.कारण सापांच्या मेंदूचा विकास झालेला नाही त्यामुळे त्यांच्या स्मरणात काहीच राहत नाही.सापांना आपली प्रतिमा कृष्णधवल दिसते.सापांना लांबी व रूंदी कळते.जाडी कळत नाही कारण,सापांची दृष्टी द्विमितीय असते.सापांना ६ फूटापलिकडे अंधूक दिसते त्यामुळे साप व्यक्ती ओळखू शकत नाही.यातही आता गावोगावी दवाखाने,हॉस्पीटल झाले आहेत.प्रत्येक गावांमध्ये सर्पमित्र तयार झाले आहेत.त्यामुळे सापांपासून घाबरण्याचे कारण राहिलेले नाही.सापांबद्दलची माहिती आता डॉक्युमेंटरी,पुस्तके,जनजागृती कार्यक्रम,बॅनर्स,पोस्टर्स द्वारे दिली जाते.यामुळे साप तितका भयावह प्राणी राहिलेला नाही.प्रत्येक माणसाने सापांना जाणून घेऊन त्यांची शास्त्रीय माहिती वाचली तर साप किती शांत व भित्रा प्राणी आहे हे लक्षात येते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या