💥 मुंगी उडाली आकाशी औद्योगिक क्षेत्रातील युवा उद्योजकाची यशस्वी गाथा....!


💥.....अन् महेश शेठ कामठे यांनी आपल्या नावाचा ठसा अत्यंत कृतिशील रित्या गुंतवायला सुरुवात केली💥

 ✍🏻लेखक :- सतिष सातोनकर परभणी

जगातील सर्वच प्रकारच्या क्रांतीचे जनक  ही युवा शक्ती असते.आर एस कामठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे कृतिशील ऊर्जावान युवा पंखांची औद्योगिक क्षेत्रातील विकासाची गगनभरारी आपल्या कुटुंबाच्या कष्ट ते पराकाष्ठा असा भगीरथी स्व कष्टाचा इतिहास असलेल्या कुटुंबाचा अत्यंत समृद्ध असा औद्योगिक वसा आणि वारसा आपले काका श्री नंदकुमार जी कामठे यांच्या कुशल आणि अनुभवी मार्गदर्शनाखाली महेश शेठ कामठे यांनी आपल्या नावाचा ठसा अत्यंत कृतिशील रित्या गुंतवायला सुरुवात केली आहे.

मागच्या भागात आपण म्हणालो होतो या कुटुंबाचे बलस्थान कौटुंबिक एकता आहे.कामठे परिवाराच्या औद्योगिक विकासाचा चढता आलेख हे त्यांच्या पराकाष्ठेचा कष्टातून उभा केलेल्या विश्वाची स्वयम् निर्मिती आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही महेश शेठ  रवींद्र कामठे, सुधीर रवींद्र जी कामठे, व त्यांचे तिसरे बंधू व कुटुंबातील औद्योगिक शेंडेफळ अत्यंत कृतिशील भाऊ ऊर्जावान युवक श्री यश नंदकुमार जी कामठे या भावांना बरोबर घेत नव्या औद्योगिक धोरणाची मुहूर्तमेढ सुरू केली आहे.

तसे हे कुटुंब क्षत्रिय मराठा तरीही राजकारणापासून कोसो दूर राहणे पसंत केले.मराठी माणसाने उद्योगात सुद्धा आपला ठसा उमटवला पाहिजे उद्योगाच्या निर्मितीतून नव्या महाराष्ट्राच्या पोलादी पायाभरणीची सुरूवात झाली पाहिजे राजकारणाशिवाय अनेक क्षेत्रांमध्ये मराठी माणूस मजबूत झाला पाहिजे हे धोरण कंपनीच्या सुरुवातीपासूनच स्वर्गीय रविंद्रजी कामठे व श्री नंदकुमार जी कामठे ज्यांनी अवलंबिले या कुटुंबाची जमेची बाजू म्हणजे सतत सकारात्मक दृष्टीने कार्यरत राहावे यासाठी घरातील कुटुंब प्रमुख यांचा असतात युवा नेतृत्वाला मार्गदर्शनाचा रोज नवा अध्याय शिकवल्या जातो.

 गणेश शेट कामठे यांनी सामाजिक व औद्योगिक क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त व्यक्तिमत्व अशी ओळख आपल्या कल्पक नेतृत्व क्षमतेतून corona महामारीमध्ये  आपत्ती असतानाही आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना कुटुंबाचा भाग समजून त्यांच्या सर्व आरोग्य विषयी जबाबदाऱ्या  स्वीकारून आपल्याकडे असलेल्या सर्व मोठ्या प्रकल्पावर ची कामे बंद पडू दिली नाही.यावरून महेश शेठ कामठे यांचे कंपनी व्यवस्थापनाचे कौशल्य लक्षात यावे.

मित्रांनो...तरुण पिढीला आदर्श असणे  ही समाजाची फार मोठी  भूक आहे महाराष्ट्रातील युवकांसाठी महेश शेठ कामठे यांचे व्यक्तिमत्व उद्योग क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी नक्कीच अनुकरणीय आहे.हल्ली व्यक्तिविशेष मध्ये काही लोकांबद्दल लिहावं असं वाटतं तेव्हा त्यांच्या आतल्या उर्जेला त्यांच्या आतल्या सकारात्मक धोरणाला समाजासमोर मांडण्याचा काम करण्याचे भाग्य आपल्याला लागत.लेखक म्हणून हे सुद्धा माझे भाग्यच जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळवत असताना नही तिक्ती ची चाड सोडली नाही पाहिजे आणि चारित्र्य गमावले नाही पाहिजे हे या कुटुंबातल्या शिकवणीचा धडा जशास तसा महेश शेठ कामठे यांनी उचलला आहे.

आदर्श म्हणजे काय आपल्या चारित्र्याला बरोबर घेत कष्टाची पराकाष्ठा करणारा युवकच देशाचा खरा प्रकाश आहे.महेश शेठ कामठे यांचे दुसरे वैशिष्ट्य असे की स्वभावातली नम्रता, समोर आलेल्या प्रत्येक व्यक्तीचे म्हणणे पहिले ऐकून घ्यायचे, आलेल्या प्रत्येक संकटातून नवीन संधी शोधून विकासाच्या नव्या दिशा शोधायचा व त्यासाठी सतत  कार्यमग्न राहायचे, आपल्या हाती असलेल्या प्रत्येक प्रकल्पावर जातीने हजर  राहणे व आपल्या कर्मचाऱ्यांना बरोबर सतत संपर्कात राहून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत त्यांची सोडवणूक करणे कदाचित हेच या युवकाच्या यशाचे गमक असावे... 

✍🏻भाग :दुसरा: राजकिय सामाजिक विश्लेषक तथा लेखक: सतीश सातोनकर. नानलपेठ परभणी. मराठवाडा .महाराष्ट्र.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या