💥पुर्णेत राज्य कोणाचे ? मोकाट जनावरांचे की आपले कर्तव्य विसरलेल्या अकार्यक्षम शासकीय मनुष्यरुपी जनावरांचे ?


💥शहरातील रस्त्यांसह बँकांचे एटीएम रेल्वे स्टेशन बसस्थानकासह विविध शासकीय कार्यालयात जनावरांचा मुक्त संचार💥


पुर्णा (दि.२० आगस्ट) - शहरासह तालुक्यात शेवटी राज्य कोणाचे ? शहरासह संपूर्ण तालुक्यात सर्वत्र मुक्त संचार करीत जनसामान्य पादचारी वाहन चालकांच्या जिवितास धोका निर्माण करणाऱ्या सैराट झालेल्या असंख्य मोकाट जनावरांचे की पगारापोटी शासनाचे हजारो रुपये उचलून आपल्या कर्तव्याचा विसर पडलेल्या अकार्यक्षम असंवेदनशिल मनाच्या शासकीय मनुष्यरुपी जनावरांचे ? असा संतप्त सवाल जनसामान्य नागरिक उपस्थित करीत असून मोकाट जनावरांमुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी वर्ग देखील अक्षरशः त्रस्त झाल्याचे निदर्शनास आहे.


या मोकाट जनावरांचा तात्काळ बंदोबस्त करावा याकरिता अनेक वेळा नगर परिषदेसह तहसिल प्रशासनाकडे देखील नागरीक तसेच शेतकऱ्यांनी निवेदन दिल्यानंतर देखील या मोकाट जनावरांसह या जनावरांच्या मालकांवर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्यामुळे शहरासह संपूर्ण तालुक्यात शेकडो गाढव डुकरांसह असंख्य मोकाट गाई बैल शहरातील सार्वजनिक रस्त्यांसह राष्ट्रीयकृत बँकांचे एटीएम,रेल्वे स्थानक,बसस्थानक,जुना मोंढा परिसर कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर आदीसह विविध शासकीय कार्यालयांच्या परिसरात अगदी सैराट होऊन मुक्त संचार करीत असून या मोकाट जनावरांमध्ये गाढवांची संख्या पाहता पाहता कमालीची वाढल्याचे निदर्शनास येत असून 


शेकडो गाढव सैराट होऊन कर्णकर्कश आवाज काढीत सार्वजनिक रस्त्यांवर एकमेकांच्या मागे धावत सुटत असल्यामुळे सार्वजनिक रस्त्याने फिरणाऱ्या अबाल वृध्द तसेच महिलांसह नागरिकांना ही सैराट झालेली गाढव अक्षरशः तुडवून जात असल्यामुळे अनेकांच्या हातापायांची हाड मोडल्याच्या देखील घटना घडत असल्याचे पाहावयास मिळत असून याही पेक्षा गंभीर बाब म्हणजे सदरील गाढवांसह अन्य मोकाट जनावर परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांची देखील मोठ्या प्रमाणात नासाडी करीत असल्यामुळे शेतकरी वर्ग अक्षरशः त्रस्त झाल्याचे निदर्शनास येत असून या मोकाट जनावर नगर परिषद प्रशासनाने ताब्यात घेऊन या मोकाट जनावरांच्या मालकांवर देखील कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या