💥पुर्णेत श्रावण पौर्णिमेनिमित्त धम्मदेशना व सत्कार समारंभाचे आयोजन.....!


💥अ.भा.भिखु संघाचे महाराष्ट्राचे सचिव भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न होणार💥

पूर्णा (दि.11 आगस्ट) - बोधिसत्व डॉक्टर बी.आर.आंबेडकर स्मारक व बुद्ध विहार समिती भारतीय बौद्ध महासभा पूर्णा  व धम्म सेवेमध्ये कार्यरत असलेल्या महिला मंडळाच्या वतीने श्रावण पौर्णिमेनिमित्त धम्मदेशना सत्कार समारंभ व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 11 ऑगस्ट 2022 या दिवशी करण्यात आले आहे. अखिल भारतीय भिखु संघाचे महाराष्ट्राचे सचिव भदंत डॉ उप गुप्त महा थेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली भंतेशिल रत्न नांदेड भंते पयावांश यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

प्रमुख अतिथी म्हणून जालना येथील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते विलास डोळसे पूर्णा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुभाष मार कड पूर्णा नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय नरळे कृषी विद्यापीठातील वरिष्ठ शास्त्रज्ञ प्राध्यापक डॉक्टर नीता गायकवाड त्याचप्रमाणे सहयोग नगर नांदेड  येथील माता रमाई महिला मंडळ इत्यादी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी 5.30 वाजता परित्राण पाठ व पूजा विधी संपन्न होईल. दुपारी 12.30 वाजता बुद्ध विहारात सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात येईल.

पूर्णा तालुक्याच्या तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या हस्ते महाराष्ट्र प्रदेश भिकू संघाच्या कार्यालयाचे नाम फलकाचे अना वरण करण्यात येईल. त्याचप्रमाणे प्रमुख पाहुण्याच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येइल.कार्यक्रमाच्या समारोपानंतर संगीता सिताराम नगारे  यांच्याकडून उपस्थितांना खीरदान करण्यात येईल.

वरील कार्यक्रमाचा लाभ घ्यावाअसे आव्हान डॉक्टर बी आर आंबेडकर स्मारक बुद्ध विहार समिती भारतीय बौद्ध महासभा शाखा पूर्णा सेवेमध्ये कार्यरत असलेल्या महिला मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या