💥परभणी जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यातील हदगाव खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अनोखा कौतुकास्पद उपक्रम....!

 


💥जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या उपस्थितीत : 3 मिनिटात 300 वृक्षारोपणासह घनवन कार्यक्रम संपन्न💥

परभणी (दि.०६ आगस्ट) - परभणी जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यातील हदगाव खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळेमध्ये घनवन उपक्रमांतर्गत परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्यासोबत 300 विद्यार्थ्यांनी एकाच वेळी जिल्हाधिकाऱ्यांसोबत 300 वृक्षांचे रोपण केले हा अनोखा उपक्रम  सेलू तालुक्यात पहिल्यांदाच संपन्न झाला. शाळेतील इयता तिसरीच्या चिमुकल्यांनी गीत गाऊन  जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत केले.  यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता

जिल्हाधिकाऱ्यांनी दिवसभरांचा थकवा विसरून विद्यार्थ्यांसोबत वृक्षारोपण केले व विद्यार्थ्यांशी हितगुज साधला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना व प्रमुख पाहुण्यांचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी गावातील श्री ह. भ. प. अंबादास पावडे व त्यांच्या पथकाने बालविवाह प्रतिबंधात्मक जनजागृती पर गीत सादर केले. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून ज्ञानेश्वरी मगर हिने आपले मनोगत व्यक्त केले. वृक्षारोपणासाठी व हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत भारत माता ची भूमिका साकारणारी प्रगती पावडे सर्वांचे आकर्षण ठरली. यावेळी घनवन उपक्रम विशेष चांगल्या प्रकारे राबवल्याबद्दल जि. प. प्रा. शाळा हदगाव खुर्द व केमापूर शाळेचे सन्मानपत्र देऊन कौतुक करण्यात आले. तसेच अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 75 रक्तदात्यांनी रक्तदान घडून आणल्याबद्दल डासाळा शाळेचे मुख्याध्यापक श्री मधुकर काष्टे यांचे सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन स्वागत करण्यात आले. उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, तहसीलदार   दिनेश झांपले, गटविकास अधिकारी विष्णू मोरे ,गट शिक्षणाधिकारी उमेश राऊत,शिक्षण विस्तार अधिकारी गजानन वाघमारे, मुख्याध्यापक श्री. इंगळे  व सर्व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख मौजम यांनी केले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या