💥राजस्थान येथील दलित विद्यार्थ्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या जातीयवादी शिक्षकास फाशीची शिक्षा देण्यात द्या....!


💥परळी तालुका व शहर वंचित बहुजन युवा आघाडीने केली मागणी💥          

परळी (दि.१७ आगस्ट) - राजस्थान येथील दलित विद्यार्थ्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या शिक्षकास फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी लेखी मागणी परळी तालुका व शहर वंचित युवा आघाडीच्या वतीने करण्यात आली असल्याची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.                            

याबाबत सविस्तर माहिती अशी की भारत देश स्वतंत्र्याच्या अमृत महोत्सव साजरा करत असताना दुसऱ्या बाजूला जातीयवादी हिंदू मानसिकतेतून आमच्या माठातील पाणी का पिले या कारणामुळे राजस्थान येथील एका शिक्षकाने अमानुषपणे मारहाण करून इंद्र मेघवाल या विद्यार्थ्यांची हत्या केली ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना असून ते कृत्य करणाऱ्या शिक्षकास फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी लेखी मागणी वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने परळी उपजिल्हाधिकारी कार्यालयास देण्यात आले असून या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा महासचिव मिलिंद घाडगे वंचित बहुजन युवा आघाडीचे तालुकाध्यक्ष राजेश सरवदे वंचित बहुजन युवा आघाडीचे शहराध्यक्ष प्रेम जगतकर तालुका उपाध्यक्ष अवी मुंडे भीमराव कसबे सिद्धार्थ मुंडे युनूस शेख उमेश उपाध्ये इत्यादीच्या सह्या असून या आरोपीस फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी ही मागणी करण्यात आली असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या