💥पुर्णा तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान....!


💥अतिवृष्टी मुळे बाधित झालेल्या पिकाचे तात्काळ पंचनामे करण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटना व प्रहार संघटनेची मागणी💥


पूर्णा (दि.१७ आगस्ट) - पुर्णा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांच्या झालेल्या नुकसानीचे महसुल प्रशासनासह तालुका कृषी विभागाकडून देखील अद्याप पर्यंत पंचणामे करण्यात आले नसल्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी पुर्णा तहसील कार्यालया तिव्र निदर्शन करीत घोषणा देत तहसीलदार पल्लवी टेमकर यांना निवेदन देऊन अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या खरीफ हंगामातील झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

पुर्णेच्या तहसिलदार पल्लवी टेमकर यांनी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभ्या पिकांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश महसुल प्रशासन व मंडळ कृषी अधिकारी,कृषी सहाय्यक,तलाठी मंडळ अधिकारी,यांना तात्काळ देऊन नुकसान भरपाई तात्काळ शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी अशी मागणी यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखालील शिस्टमंडळाने केली असून शिष्ट मंडळात स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष किशोर ढगे,कामाजी लोखंडे, स्वाभिमानी शेतकरी संघटना पूर्णा तालुका अध्यक्ष पंडित भोसले, दिगंबर पवार ,राम दुधाटे ,सचिन शिंदे ,केरबा चव्हाण, कैलास लोखंडे, बालकिशन चव्हाण, सुदर्शन लोखंडे, बालाजी लोखंडे, रामदास लोखंडे, विठ्ठल चव्हाण, देविदास चव्हाण, मुरली कदम,आधी प्रती गाव दोन सदस्य शेतकऱ्यांनी तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्याशी चर्चा केली व संबंधित पंचनामे करून तात्काळ   शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली यावर तहसीलदार पल्लवी टेमकर  म्हणाल्या की पंचनामा अहवाल न आल्यास संबंधित कर्मचाऱ्यावर मी कार्यवाही करणार असे आश्वासन पल्लवी टेमकर तहसीलदार पूर्णा यांनी शेतकऱ्यांना दिले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या