💥कॉंग्रेस पक्षाची गंगाखेड ते जिंतूर ‘भारत जोडो’ पदयात्रा - आ. सुरेश वरपुडकर


🔹गंगाखेडात पार पडली बैठक🔹

गंगाखेड : कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची येत्या २ ऑक्टोबर पासून कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो पदयात्रा आयोजीत करण्यात आली आहे. या पदयात्रेस पाठिंबा देत केंद्र सरकारच्या जाचक कारभाराविरुद्ध आवाज ऊठवण्यासाठी परभणी जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने येत्या ९ ऑगस्ट रोजी गंगाखेड ते जिंतूर पदयात्रा केली जाणार आहे. गंगाखेड येथून या यात्रेचा शुभारंभ होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष, आ. सुरेश वरपुडकर यांनी दिली असून या पदयात्रेत जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. 

या संदर्भात गंगाखेड येथील शासकीय विश्रामगृहात एक बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आ. सुरेश वरपुडकर हे होते. जिल्हा सरचिटणीस बालासाहेब फुलारी, परभणी मनपा गटनेते भगवानराव वाघमारे, रामभाऊ घाडगे, सोनपेठ तालुकाध्यक्ष प्रा. मुंजाभाऊ धोंडगे, स्थाई समिती सभापती गुलमीर खान, जिल्हा ऊपाध्यक्ष ॲड संतोष मुंडे, ॲड हनुमंत जाधव, जेष्ठ नेते बाबुराव गळाकाटू, गंगाखेड तालुकाध्यक्ष गोविंद यादव, शहराध्यक्ष शेख युनूस, युवा नेते सुशांत चौधरी, पालम तालुकाध्यक्ष कृष्णा भोसले, गुलाबराव सीरस्कर, सेवा दल तालुकाध्यक्ष रोहिदास घोबाळे, युवक प्रदेश सरचिटणीस प्रणित खजे, युवक जिल्हाध्यक्ष अभय कुंडगीर, मागासवर्गीय सेल जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर साळवे, युवक मिडीया राज्य सहसमन्वयक सिद्धार्थ भालेराव, गणेश शिंदे, न. प. सदस्य नितीन चौधरी, प्रमोद मस्के, उपसरपंच लक्ष्मण घोलप, हंसराज जाधव, शामराव मुंडे, पंडीत चौधरी, डॉ फेरोज शेख, संतोष समशेटे, नागेश डमरे, सुनिल सोळंके आदिंची प्रमुख ऊपस्थिती होती. 

गंगाखेड येथून प्रारंभ होवून जिंतूरात समारोप केल्या जाणाऱ्या पदयात्रेत जिल्हाभरातून हजारो कार्यकर्ते सहभागी होतील. जवळपास १०० किमी अंतराच्या या पदयात्रेचे पाच मु्क्काम होणार असून ठिकठिकाणी सभा, बैठका, विविध कार्यक्रम घेतले जाणार आहेत. ही पदयात्रा जिल्ह्याचे राजकीय चित्र बदलणारी ठरेल, असा विश्वास आ. वरपुडकर यांनी व्यक्त केला. येत्या ९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता गंगाखेड येथून या पदयात्रेचा शुभारंभ होणार असून तालुका आणि शहर कॉंग्रेसच्या वतीने जय्यत तयारी केली जाणार असल्याची माहीती तालुकाध्यक्ष गोविंद यादव, शहराध्यक्ष शेख युनूस यांनी या बैठकीत दिली....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या