💥राज्यस्तरीय अथॅलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत जिल्ह्यास चालण्याच्या स्पर्धेत गौरी खंदारे ला सुवर्णपदक.....!


💥तर ऋतुजा कोमटवार ला कास्यपदक : राज्यस्तरीय स्पर्धेत पुर्णेचे नाव रोशन करणाऱ्या या स्पर्धकांचे होत आहे सर्वत्र कौतुक💥


नाशिक येथे 16 वर्षातील मुलींच्या गटात 3000 मी. चालण्याच्या स्पर्धेत पूर्णेतील कु.गौरी गंगाधर खंदारे हिने 19.42.01 मिनिटात शर्यत पूर्ण करून परभणी जिल्ह्यास सुवर्णपदक मिळवून दिले.याच गटात व क्रीडा प्रकारात कु.ऋतुजा बालाजी कोमटवार ह्या खेळाडूने 20.27.31 मिनिटात आपली शर्यत करून परभणी जिल्ह्यास कास्यपदक प्राप्त करून दिले या दोन्ही खेळाडूंची राष्ट्रीय स्तरावर निवड झालेली आहे ह्या खेळाडूंना क्रीडा शिक्षक सज्जन जैस्वाल सर यांचे मार्गदर्शन लाभले.


या यशाबद्दल परभणी जिल्ह्यचे खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव परभणी जिल्ह्यचे आमदार राहुल पाटील गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टे महाराष्ट्र असोशिएशनचे  कोषाध्यक्ष माधव शेजुळ  परभणीचे जिल्हा प्रमुख विशाल कदम विद्या प्रसारिणी सभेचे अध्यक्ष मा. श्री दत्तात्रय वाघमारे, संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री.भीमरावजी कदम, संस्थेचे सचिव श्री विजय रुद्रवार, श्रीनिवास काबरा, उत्तमराव कदम साहेबराव कदम माजी मुख्याध्यापक डॉ. हरिभाऊ पाटील,  मुख्याध्यापक डी एल उमाटे  इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका  अतिया  बेगम पूर्णा तालुका अथॅलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष श्री सुधाकर खराटे,परभणी जिल्हा लंगडी संघटनेचे अध्यक्ष श्री संतोष एकलारे, राजु अण्णा एकलारे  अमृतरावज कदम  गोविंद कदम शाम कदम सतिश टाकळकर गणेश कदम प्रकाश बनाटे क्रीडा शिक्षक सुशीलकुमार देशमुख सतीश बरकुंटे, महेश जाधव रावसाहेब हनवते अब्दुल अन्सार मुन्ना राठोड त्र्यंबक नडसकर सचिन डहाळे  सचिन पांचाळ शिवम स्वामी संजय कदम तसेच सर्व शिक्षकवृंद शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे....

**********************************************
कौतुकास्पद....✍🏻


परभणी जिल्ह्यास ॲथलेटिक्समध्ये आठ वर्षानंतर सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या गौरी खंदारे व कास्यपदक पटकावणाऱ्या ऋतुजा कोमटवारचे तसेच तिचे कोच सज्जन जैस्वाल सरांचे अभिनंदन करतांना जेष्ठ पत्रकार लोकप्रिय आदर्श शिक्षक तथा दैनिक सकाळचे प्रतिनिधी श्री.जगदीश जोगदंड सर व शिवसेना मा.जिल्हाप्रमुख तर सहसंपर्क प्रमुख सुधाकर खराटे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या