💥पुर्णा तालुक्यातील शिरकळस येथील शाळेत ७५ वा स्वातंत्रदिन उत्साहात साजरा....!


💥यानंतर राष्ट्रांगित व संविधानाचे वाचन करून मुख्याध्यापक महेश पवार यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहन💥


ताडकळस / प्रतिनिधी 

पुर्णा तालुक्यातील ताडकळस येथून जवळच असलेल्या मौजे शिरकळस येथे सोमवार दि 15 आगस्ट 2022 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ७५ वा स्वातंत्र्याचा 'अमृत महोत्सव' या निमित्त शाळेतील विद्यार्थ्यांची गावातील प्रमुख मार्गाने प्रभातफेरी  काढण्यात यावेळी विद्यार्थ्यांनी भारत माता की जय, वंदेमातरम या जयघोशात शिरकळस नगरी दुमदुमून गेली.यानंतर सर्व प्रथम रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज,संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, मोहनदास गांधी यांच्या प्रतिमेचे हार पुष्पाने पूजेन मान्यवराच्या हस्ते करण्यात आले.


यानंतर राष्ट्रांगित व संविधानाचे वाचन करून मुख्याध्यापक महेश पवार व शा.व्य. समिती अध्यक्ष अंगदराव भोसले यांच्या हस्ते शालेय ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विशेष म्हणजे इयत्ता पहिलीच्या विद्यार्थिनी कीर्ती भगवान राऊत तसेच पूजा एकनाथ भोसले,रोहिणी ज्ञानेश्वर भोसले,धनंजय कुंडलिक भोसले, शिवराज अंगद भोसले यांनी महापुरुषांच्या विचारधारेवर भाषणे केली. पूजा एकनाथ भोसले उत्कृष्ट महापुरुषाच्या विचारावर भाषण केल्याबद्दल या विद्यार्थिनीला माजी सरपंच संजयराव भोसले यांनी 101 रुपयाचे बक्षीस दिले तसेच भाषणामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना शाळा समिती उपाध्यक्ष दिलीपराव भोसले यांच्यातर्फे पेन भेट देण्यात आली.विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीताचे गायन करून सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.यानंतर झालेल्या कार्यक्रमात एक झाड एक मूल या जिल्हा परिषदेच्या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वृक्षाचे वाटप करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालयाच्या निधीतून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून शाळेला कायमस्वरूपी वीजपुरवठा होण्यासाठी एक इन्व्हर्टर बसविण्यात आले.यावेळी गावातील ग्रामसेविका श्रीमती सीमा गिरी ,सरपंच मीराताई भोसले, उपसरपंच, ग्रा पं सदस्य ,व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष,सदस्य, अंगणवाडी ताई,शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक महेश पवार यांनी केले. सदरील कार्यक्रमात गावातील शिक्षण प्रेमी युवक मंडळ अनंत गणेशराव भोसले, भागवत हरिभाऊ भोसले, विष्णू बबनराव भोसले यांच्यातर्फे सर्व विद्यार्थ्यांना वही व पेन भेट देण्यात आली. तसेच दैनिक क्रांतीशस्त्रचे संपादक धम्मपाल यादवराव हानवते यांच्यातर्फे सर्व विद्यार्थ्यांना बिस्किट वाटप करण्यात आले. शाळा व्यवस्थापन समिती यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांना केळीचे वाटप करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे आभार सहशिक्षक ढगे सर यांनी मानून  कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. एकंदरीत अशाप्रकारे देशाचा ७५ वा अमृत महोत्सव मोठ्या हर्ष उल्हासात संपन्न झाला......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या