💥पुर्णा तालुक्यातील फुकटगाव येथील सतत नवोपक्रम राबविणारी एकमेव शाळा म्हणजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा....!


💥जिल्ह्यातील जवळपास 2000 शिक्षकांनी शाळा व शाळेची गुणवत्ता पाहण्यासाठी शाळेला आतापर्यंत भेटी दिल्या💥

आमच्या फुकटगाव शाळेने मागील आठ वर्षांपासून अनेक उपक्रम राबविले आहेत.पहिली ते आठवीपर्यंतची पूर्णा तालुक्यातील पहिली ज्ञानरचनावादी शाळा म्हणून शाळेला लौकिक लाभला आहे.आम्ही आठही वर्ग अगदी सुंदर रीतीने ज्ञानरचनावादी तयार केले त्यात प्रत्येक वर्गात खाली फरशीवर ज्ञानरचनावाद तयार करणे असो,भिंतीवर स्वतः लिफाफे तयार करून वर्गसजावट असो,ज्ञानरचनावादाचे स्वतः तयार केलेले साहित्य असो,रंगकाम,शाळेचा लोगो तयार करणे असो अश्या अनेक बाबीं शाळेत राबवून शाळा अगदी सुंदर तयार केली.याच धर्तीवर बाहेर जिल्यातील नांदेड व हिंगोली येथील तसेच आपल्या परभणी जिल्ह्यातील जवळपास 2000 शिक्षकांनी शाळा व शाळेची गुणवत्ता पाहण्यासाठी शाळेला भेटी दिल्या.

 


      शाळेचा परिपाठ हा मराठी,हिंदी व इंग्रजी भाषेतून होतो. पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांचा परिपाठ सादरीकरणात सहभाग असतो व  परिपाठात दररोज साउंड सिस्टीम चा वापर केला जातो.परिपाठात दररोज 5 विद्यार्थ्यांना इंग्रजीत 5 घटकांवर बोलण्याची 8 वी पासून खालच्या सर्व वर्गांना संधी दिली जाते.राष्ट्रीय सण,नेत्यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना भाषणाची संधी शाळेत उपलब्ध करून दिली जाते.जिल्ह्यातील पहिली सोलार सिस्टीम युक्त शाळा व तसेच सोलार सिस्टीमची सतत विद्युत असते त्यामुळे शाळेतील सर्व विद्युत उपकरणे चालतात.अध्यापनात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.

      *शाळेत आजपर्यंत राबविण्यात आलेले उपक्रम-दर्जेदार स्नेहसंमेलन त्याद्वारे अडिच लाखांवर निधी जमा,ईतर लोकवर्गणीतून दिड लाखांवर निधी जमा व त्या निधीतून ज्ञानरचनावाद व रंगरंगोटी, ग्राम पंचायत निधीतून 1 KV सोलार  सिस्टीम-वॉटर फिल्टर व त्यासाठी लागणारे सर्व साहित्य व 5 रुमवरील  व त्या रूमच्या व्हरांड्यातील दर्जेदार पत्रे बदलून दिले,उत्कृष्टरीत्या शाळा पूर्व तयारी मेळावा ,आनंद नगरी,हातावर मेहंदीद्वारे ABCD-गणिती सूत्रे हातावर रेखाटने,निसर्ग सहल,वनभोजन,परजिल्हा सहल,वृक्षारोपण व संवर्धन, झाडांना राखी बांधून झाडाचे रक्षण करण्यासाठी घेतलेली जबाबदारी, कचऱ्यापासून होळी,फटाके मुक्त दिवाळी,होळीसाठी नैसर्गिक रंग वापरासाठी विद्यार्थ्यांचे केलेले उद्बोधक,दर शनिवारी योगासने किंवा कवायत,मागील आठ वर्षांपासून विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलता यावी यासाठी वेगवेगळ्या घटकावर आधारित सहज सोप्या प्रश्न-उत्तराच्या मदतीने सर्व विद्यार्थ्यांचा घेतलेला सराव,इंग्रजी लिखाणासाठी Information About My Father..अश्या अनेक टॉपिकवर लिखाणाचा सराव घेतला,मागील आठ वर्षांपासून मार्च व एप्रिल महिन्यात शालेय वेळेनंतर विद्यार्थ्यांना मोफत जादा तासिका घेऊन शिकवलेला इंग्रजी Tense,20 इंग्रजी शब्दांपासून 625 वाक्य बनविणे उपक्रम,विविध स्पर्धा परीक्षांना विद्यार्थ्यांना बसविणे जसे की नवोदय-स्कॉलरशिप-श्रेया-NMMS-BDS इत्यादी,स्पर्धा परीक्षेच्या सरावासाठी जादा तासिका घेणे,परीक्षेचा शनिवार उपक्रम-शनिवारी दुपारी शाळा सुटल्यावर स्पर्धा परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची सराव परीक्षा घेणे व तेंव्हाच पेपर तपासून निकाल देने,दर सोमवारी अनुलेखन व दर शनिवारी श्रुतलेखन मराठी,हिंदी व इंग्रजी या क्रमाने घेणे,दर शनिवारी गणिताची 20 गुणांची चाचणी घरी सोडविण्यासाठी देणे,मराठी-गणित-इंग्रजीचा दिवाळी व उन्हाळी अभ्यास दिला जातो, मराठीचे जोडाक्षरयुक्त शब्द लेखन व वाचन सराव,मराठीच्या कविता विद्यार्थ्यांना लिखाणासाठी प्रोत्साहन देणे,हळदी कुंकवाचा कार्यक्रम दरवर्षी घेऊन त्याद्वारे महिलांना अभ्यासाविषयी मार्गदर्शन,किशोरवयीन मुलींना शारीरिक-मानसिक बदलाविषयी मार्गदर्शन करण्यात येते,16 वर्षावरील मुलांना करिअर मार्गदर्शन, ग्रंथालयातील पुस्तके विद्यार्थ्यांना वाचनासाठी दिले जातात,बैलपोळ्याला चिखलकाम घेतले जातो,कोरोना काळात-व्हाट्सएपच्या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू,अभ्यास गट स्थापन करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, गट पद्धतीने अध्यापन केले,झूम ऍप व गूगल मीट च्या माध्यमातून ऑनलाइन क्लास घेतले,गावात 11 ठिकाणी विद्यार्थी अभ्यास फलकांची निर्मिती व त्या द्वारे कोव्हिडच्या नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांना अभ्यास देने व तपासणे,शाळा बंद..पण शिक्षण सुरू या ऑनलाईन स्वाध्याय उपक्रमात विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट सहभाग.हे सर्व उपक्रम शाळेवर राबविले जातात.आमच्या शाळेचा एकच ध्यास..विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास !*


     *शाळेच्या सर्व दर्जेदार व गुणवत्तापूर्ण उपक्रमाची दखल घेऊन शाळेतील सहशिक्षक श्री आबनराव पारवे यांना तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार व मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई  2021 चा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. व तसेच शाळेतील प्राथमिक पदवीधर शिक्षक भागवत शिंदे यांना पण मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी,मुंबई 2022 चा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.*


     *एकंदरीत शाळेची वाटचाल ही विद्यार्थ्यांचा सर्वांग सुंदर विकास व तसेच गुणवत्ता पूर्ण मार्गाने सुरू आहे.*

               *शब्दांकन-*

               *आबनराव पारवे,*

               *स.शि.जि.प.प्रा.*

               *शाळा,फुकटगाव.*

               *ता.पूर्णा.जि.परभणी.*

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या