💥परभणी येथील ‘राजे संभाजी मित्र मंडळाच्या दही हंडी महोत्सवाची तयारी पूर्ण...!


💥दही हंडी महोत्सवात प्राजक्ता माळी यांची उपस्थिती लक्षवेधी : दही हंडी महोत्सवात अनेक संघ सहभागी होणार💥

 परभणी (दि.19 आगस्ट) :  राजे संभाजी मित्र मंडळाच्या वतीने रविवार 21 ऑगस्ट रोजी जिंतूर रस्त्यावरील महात्मा फुले शाळेच्या भव्य प्रांगणात ‘माखन चोर दहीहंडी स्पर्धा 2022’ चे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेच्या निमित्ताने मैदानासह प्रेक्षक गॅलरी व अन्य व्यवस्थापनात्मक कामे पूर्णत्वास आली आहेत.

           राजे संभाजी मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राजे संभाजी मित्र मंडळाच्या वतीने मागील 20 वर्षापासून ‘माखन चोर दहीहडी स्पर्धा’ होत आहेत. या स्पर्धेत परभणी जिल्हासह राज्यभरातून नामांकित गोविंद पथके दरवर्षी दाखल होतात. मागील दोन वर्ष कोरोनाचे सावट असल्याने मंडळाने स्पर्धा रद्द केल्या. मात्र, यावर्षी याचे स्वरुप भव्य असे असणार आहे.

            या वर्षीच्या स्पर्धेमध्ये विजेत्या संघाला मंडळाद्वारे प्रथम पारितोषिक 1 लाख 1 हजार, द्वितीय पारितोषिक 71 हजार, तृतीय पारितोषिक 51 हजार दिले जाणार आहे. यावर्षी दहीहंडी स्पर्धेसाठी मराठीतील सिनेतारका प्राजक्ता माळी आणि अभिनेत्री नृत्यांगणा सुकन्या काळण यांची विशेष उपस्थिती लक्षवेधी राहणार आहे. स्पर्धेसाठी डान्स महाराष्ट्र डान्स कार्यक्रमात असणारी प्रसिद्ध ऑर्केस्ट्रा टीम देखील बोलवण्यात आली आहे.

              दरम्यान, महात्मा फुले विद्यालयाच्या मैदानावर भव्य एलईडी लाईट व्यवस्था व साऊंड सिस्टिम लावण्यात येत आहे. शुक्रवार 19 ऑगस्ट रोजी शिवसेनेचे माजी मनपा सदस्य तथा जिल्हा बँकेचे संचालक अतुल सरोदे, गंगाप्रसाद आनेराव, युवा सेना जिल्हाप्रमुख अर्जुन सामाले, प्रविण गोमचाळे, संजय सारणीकर, प्रदीप भालेराव, शुभम पाष्टे, विकी पाष्टे, विठ्ठल शिंदे, बाळासाहेब जाधव, मारोती इक्कर, सुभाष टाक, झैलसिंग बावरी, निलेश जगताप, विकास जैस्वाल, बंडूअण्णा जाधव, उदय गिरी, विनायक बनसोडे, पंकज झरकर, यश चांदेकर, सचिन मोटे, अभिजीत मुंडे, संतोष कांबळे, अमोल जाधव, गोपाळ उदावंत, गोविंद माने, अशोक कांबळे, सौरभ पाष्टे, राजू मस्के, संदीप देशमुख आदींनी पाहणी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या