💥कर्मकांड टाळून वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ वृक्षारोपण.....!


💥राष्ट्राला विश्वगुरू बनवण्यासाठी कर्मकांडापेक्षा पुरोगामी विचारांचीच अधिक गरज - साहेब शिंदे

ताडकळस /प्रतिनिधी

परभणी (दि.१३ आगस्ट) - तालुक्यातील परळगव्हाण येथील साहेबराव शिंदे यांचे वडील कोंडीबा राव सखारामजी शिंदे यांचे दिनांक 11 ऑगस्ट 2022 रोजी वयाच्या 70 व्या वर्षी दुःखद निधन झाले पुरोगामी व आधुनिक विचारांचा वारसा जपणारे साहेबराव शिंदे यांनी वडिलांच्या मृत्यू पश्चात अनावश्यक विधींचे कर्मकांड टाळले. राख गंगेत न टाकता ती राख स्वतःच्या शेतात टाकून त्यावर आठवण म्हणून वृक्षारोपण केले. त्यामुळे जल प्रदूषणही टाळले आणि विटाळ तीन दिवसात फेडला. यावेळी परिवारातील सर्व सदस्य नातेवाईक व मित्रमंडळी उपस्थित होते .

भारतीय समाज व्यवस्थेत माणसाच्या आयुष्यात जन्मापासून मृत्यूपर्यंत अनेक नाहक कर्मकांड चिटकले आहे त्यामुळेच देशाच्या प्रगतीला खेळ बसली आहे अनेक लोकांना स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर हक्काचे घर नाही परंतु शोषण करणारे कर्मकांड मात्र कायम चिटकलेले आहे स्वतःला सावरत देशाला सावरण्यासाठी अशाच पुरोगामी विचारांची गरज आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या