💥बंडखोर आमदार शहाजीबापू नौटंकी माणूस, फक्त विनोद करु शकतो विकास नाही - खा.विनायक राऊत


💥'शहाजीबापू इज नॉट ओक्के शिवसेनाच ओक्के' असे म्हणत असल्याची प्रतिक्रिया विनायक राऊत यांनी दिली💥

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या ऐतिहासिक बंडानंतर 'काय डोंगार, काय झाडी,काय हाटील' या डायलॉगमुळे रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आलेले आमदार शहाजीबापू पाटील यांना शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी लक्ष्य केले आहे. 

शहाजीबापू यांच्यासारखा नौटंकी करणारा माणूस राजकारणात फक्त विनोद करु शकतो पण एखाद्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करु शकत नाही ही बाब सांगोला मतदारसंघातील जनतेच्या लक्षात आली आहे त्यामुळे तिथली लहान मुलं,विद्यार्थीही,'शहाजीबापू इज नॉट ओक्के शिवसेनाच ओक्के' असे म्हणत असल्याची प्रतिक्रिया विनायक राऊत यांनी दिली आता या टीकेला एकनाथ शिंदे गोटातून काय प्रत्युत्तर दिले जाणार हे पाहावे लागेल. 

गेल्या काही दिवसांत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सातत्याने शिंदे गटातील आमदारांवर आगपाखड करत आहेत हे सर्वजण गद्दार आहेत हे ठसवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे गटाकडून गेला जात आहे. शहाजीबापू यांनाही सांगोल्यात शह देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी नुकताच एक मोठा निर्णय घेतला होता. 

ओ.बी.सी. नेते लक्ष्मण हाके यांना पक्षात प्रवेश देत उद्धव ठाकरे यांनी सांगोल्यातच शहाजीबापू पाटील यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे आगामी विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण हाके यांना शहाजीबापू यांच्याविरोधात रिंगणात उतरवले जाऊ शकते या पार्श्वभूमीवर लक्ष्मण हाके हेदेखील जोमाने कामाला लागले होते विधानसभेच्या उमेदवारीबाबत त्यांनी म्हटले की निवडणुकीच्या आधी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे योग्य निर्णय घेतील. 

मात्र एक शिवसैनिक म्हणून सांगोला तालुक्यातील प्रत्येक गावात प्रत्येक वस्तीवर आम्ही शिवसैनिक मोठ्या ताकदीने उभा करू. महाराष्ट्रातील सर्वसामान्य कुटुंबामधील तरुणांना एकत्रित करत आहोत माझ्यासमोरील सर्वात मोठं आव्हान हे सांगोला तालुक्यातील प्रत्येक वाडी-वस्तीवर शिवसेनेचा कार्यकर्त्या उभा करणे आणि शिवसेनेची शाखा स्थापन करणे आणि त्याच नियोजनाची सुरवात हा मेळावा असेल असे लक्ष्मण हाके यांनी म्हटले होते....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या