💥माविम आणि बँक ऑफ बडोदा शाखा परभणीचा बँक लिंकेज करिता समझोता करार....!


💥जिल्ह्यातील लोक संचलितसाधन केंद्र स्थापित महिला बचत गटना यामुळे अत्यंत सहजपणे कर्ज उपलब्ध होणार💥 

परभणी (दि.02 आगस्ट) : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात बँक ऑफ बडोदा शाखा परभणीचा  व लोक संचलीत साधन केंद्र यांच्यात माविमच्या माध्यमातून समझोता करार संपन्न झाला असून जिल्ह्यातील लोक संचलितसाधन केंद्र स्थापित महिला बचत गटना यामुळे अत्यंत सहजपणे कर्ज उपलब्ध होणार आहे. यामुळे जास्तीत जास्त बचत गटांना मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा वेळेच्यावेळी उपलब्ध होईल त्यामुळे महिला नवउद्योजक बनण्यास व सोशल इंटरप्रेरनर्स बनण्यास  सहकारी होईल महिला स्वयसाहता बचत गटांना, उद्योजक महिलांना ,संयुक्त उद्योजक समुह (JLG) या तीन प्रोडक्टकरिता. बँकेकडून कर्ज उपलब्ध होणार आहे.

            प्रगती लोक संचलित साधन केंद्र, उत्कर्ष लोक संचलित साधन केंद्र ताडकळस, नई रोशनी लोक संचलित साधन केंद्र  परभणी,  आकांक्षा लोक संचलित साधन केंद्र  परभणी या चार लोक संचलित साधन केंद्र ,MOU समझोता करार संपन्न झाला. माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी बाळासाहेब झिंझाडे म्हणाले की , बचत गटातील महिलांना उद्योग व्यवसाययास  चालना  देण्यासाठी व नवउद्योजक  त्याच बरोबर उद्योग व्यवसायास   भरभराटी देण्याच्या दृष्टीने हा समझोता करार महिला विकासाचा केंद्रबिंदु ठरेल व महिलांना विकासाच्या नव्या संधी उपलब्ध होतील. मविमच्या माध्यमातून सद्यस्थितीत आठ  लोक संचलित साधन केंद्राच्या माध्यमातून चार हजार बचत गटाचे  व 47 हजार  महिलाचे  संघटन यशस्वीरित्या उभे आहे. प्रती वर्षी बचत गटांना 30 ते 35 कोटीचे  कर्ज उपलब्ध करून दिल्या जाते. व परतफेडीचा रेशो  99.8 असल्याचे सांगितले.

            सद्यस्थितीत 37.2 कोटी कर्ज बचत गटाच्या अंगावर आऊटस्टँडिंग आहे. ही खरोखरच अभिमानास्पद व कौतुकास्पद बाब आहे . या समझोता करारामुळे आणखी यात  वाढ होणार आहे. बँक ऑफ बडोदाचे शाखा व्यवस्थापक  श्री. पाटील   बचत गटाने बँके मार्फत घेतलेल्या कर्जाचा उपयोग उत्कृष्ट पद्धतीने उद्योग व्यवसाया करीता करावा व त्या माध्यमातून दर्जेदार उत्पादन युरोपिय देशात जावे व जास्तीत गटाने याचा सदउपयोग करून घ्यावा. असे सांगितले तर बँक ऑफ बडोदाचे विभागीय अधिकारी रोहित गजभिये  यांनी बँकेच्या माध्यमातून जास्तीत जास्त बचत गटांना आवश्यकतेनुसार अमच्याकडून कर्ज उपलब्ध होईल त्यामुळे उत्पादन वाढीस चालना मिळेल यांचा लाभ लोक संचलित साधन केंद्राच्या माध्यमातून  बचत गटातील महिलांनी घ्यावा  असे सांगितले.

       या कार्यक्रमासाठी माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी बाळासाहेब झिंझाडे , बँक ऑफ बडोदाचे विभागीय अधिकारी रोहित गजभिये, बँक ऑफ बडोदाचे शाखा अधिकारी पाटील , सहायक जिल्हा समन्वय अधिकारी निता अंभोरे, कार्यक्रम अधिकारी  प्रकाश दवने व  चारही  लोकसंचलित  साधन केंद्राचे अध्यक्ष, सचिव उपस्थित होते. मविमचे लेखाधिकारी शिवराज राऊत , कैलास मोतीपवळे, किरण तांदळे, जयसिंग ठाकूर, लोक  संचलीत साधन  केंद्राचे व्यवस्थापक, लेखापाल, आदी  मान्यवर उपस्थित होते . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयश्री टेहरे यांनी केले तर  आभार गंगासागर भराडे यांनी मानले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या