💥परभणी जिल्ह्यातील जितूर रस्त्यावरील धर्मापुरी शिवारात स्थागुशाने चोरीची जीप केली जप्त....!


💥या प्रकरणी तिघांची चौकशी सुरू💥

परभणी (दि.२२ आगस्ट) : जिल्ह्यातील जिंतूर रस्त्यावरील धर्मापुरी शिवारात स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या एका पथकाने चोरीला गेलेली बोलोरे जीपगाडी जप्त केली.

 या बाबत सविस्तर वृत्त असे की जालना जिल्ह्यातून आज सोमवार दि.२२ आगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एक बोलोरे क्रमांक एम.एच.21- 5581या क्रमांकाची गाडी चोरीस गेल्याची व ती गाडी जिंतूर कडून परभणीच्या दिशेने जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या व ग्रामीण पोलिसांच्या पथकांना कळाली. त्या आधारे मौजे धर्मापुरी शिवारात जीप गाडी थांबविण्यात आली. चौकशी करण्यात आली. त्यातून जीपगाडी चोरीची असल्याची माहिती कळाल्याबरोबर स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने वाहन तर जप्त केले व तीघांची चौकशी सुरु केली आहे....

[छायाचित्र - प्रतिकात्मक]

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या