💥भारत देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ध्वजनिर्मिती केंद्रास क्षेत्रभेट...!


💥नांदेड येथील जुने संस्थान व देशात प्रसिद्ध असलेले अव्वल दर्जाचे ध्वज निर्मिती केंद्र म्हणून ओळखले जाते💥


नांदेड (दि.05 ऑगस्ट) : भारत देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शहराच्या तरोडा (बु) भागातील माऊंट लिटेरा झी स्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी क्षेत्रभेट या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वर्षाचे औचित्य साधून शुक्रवार, ता. 5 ऑगस्ट रोजी सकाळी नांदेड येथील जुने संस्थान व देशात प्रसिद्ध असलेले अव्वलदर्जाचे ध्वज निर्मिती केंद्र म्हणून ओळखले जाणारे खादी ग्रामोद्योग केंद्र, नांदेड येथे भेट देण्यात आली. 


नांदेड नगरीत असलेले हे प्रसिद्ध ठिकाण हे सर्व नागरिकांसाठी व विद्यार्थ्यांसाठी अभिमानाची बाब आहे. याप्रसंगी विद्यार्थ्यांना ध्वज निर्मिती विषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले . सध्या वापरात असलेले व्यावसायिक ध्वज निर्मिती केंद्र आणि शासनाने सहकार तत्वावर चालवत असलेले ध्वज निर्मिती केंद्र यामधील फरक जाणून घेता आला. विद्यार्थ्यांनी संवाद साधून आपल्या समस्यांचे निराकरण केले. यामध्ये या केंद्राचे स्थापना वर्ष, ध्वजाचे वेगवेगळे आकार, ध्वज निर्मितीवरील प्रक्रिया, प्रत्यक्ष खादी पासून बनवलेले अनेक वस्त्र आदी बाबींची माहिती जाणून घेतली. ध्वज निर्मिती करत असताना अनावश्यक असलेल्या धाग्यांपासून व कापडांपासून हस्तकलेतून बनवलेले  कागद पूर्व प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या शिफारस पत्रासाठी वापरले जात होते. असा इतिहास असलेल्या या केंद्राच्या भेटीतून प्रत्यक्ष कृती द्वारा शिक्षण दिले गेले. देशातील विशिष्टता लाभलेल्या या केंद्रामधून सबंध भारतभर मोठ्या प्रमाणात ध्वजांची मागणी आहे. येत्या दि. 13 ते  15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी राष्ट्रीय ध्वज लावण्याचे भव्य अभियान राबविण्यात येत आहे. त्यास अनुसरण या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन प्राचार्य रमिंदर कौर मॅडम यांच्या संकल्पनेतून करण्यात आले होते. उपक्रमात शाळेतील शिक्षिका यांनीही सहभाग घेतला. वरील संकल्पना राबविण्यासाठी शाळेचे सचिव श्री सचिन पवार, संचालिका सौ. मिनाक्षी पवार यांनी प्रोत्साहन दिले. शाळेतील विद्यार्थी घरोघरी तिरंगा उपक्रमाचे प्रसार करण्यासाठी आग्रही भूमिका अंगीकरणार आहे अशी माहिती प्राचार्या रमिंदरकौर मोदी यांनी येथे दिली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या