💥प्र.प्राचार्य डॉ.संतोष कुऱ्हे यांनी लोकमान्य टिळक व साहित्यसम्राट अण्णाभाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले💥

-------------------------------

पूर्णा - येथील स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी   पवार महाविद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा स्मृतीदिन व सत्यशोधक साहित्यसम्राट  अण्णा भाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.संतोष कुऱ्हे यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व सत्यशोधक साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक,कर्मचारी व विद्यार्थी यांनीही लोकमान्य बाळ गंगाधर टिळक  व सत्यशोधक साहित्यसम्राट  अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.डॉ. प्रकाश सूर्यवंशी यांनी केले तर आभार महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.जगन्नाथ टोंपे यांनी मानले. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक,कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या