💥पुर्णा तालुक्यातील गौर गावातील जिल्हा परिषद शाळेच्या विकासासाठी लाखो रुपयांचा शासकीय विकासनिधी...!


💥गौर ग्रामपंचायतीकडून जिल्हा परिषद शाळेच्या विकासासह शाळेतील सुविधांकडे दुर्लक्ष : विद्यार्थी मात्र बेहाल💥

(भाग क्र.०४) : गाव तस चांगल पण.....

✍🏻परखड सत्य :- चौधरी दिनेश -


पुर्णा (दि.०४ आगस्ट) - पुर्णा तालुक्यातील पुर्णा-नांदेड राज्य महामार्गावरील जागृत हेमाडपंथी सोमेश्वर महादेव मंदिर देवस्थान व हेमाडपंथी भव्य बारवा मुळे धार्मिक पर्यटन स्थळाच्या अघोषीत यादीतील महत्वाचे गौर गाव शासनाचा कोट्यावधी रुपयांचा विकासनिधी प्राप्त झाल्यानंतर देखील विकासापासून वंचित राहिल यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही परंतु गावातील परिस्थिती बघितल्यास सहजच एखाद्या सद्गृहस्थाच्या मुखातून शब्द बाहेर पडतात अहो....'गाव तसे चांगले पण भ्रष्ट ग्रामपंचायत प्रशासनातील भ्रष्ट ग्रामविकास अधिकारी आणि जनमतावर निवडून आलेल्या भ्रष्टाचारी सरपंचांनी अक्षरशः एशीला टांगले' भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाची अधिकृत वेबसाईड असलेल्या ई-ग्राम स्वराज्यवर गौर गावातील विकासा संदर्भात मागील चार/पाच वर्षाच्या कालावधीत शासनाने दिलेल्या कोट्यावधी रुपयांचा शासकीय विकासनिधीचा अभ्यास केल्यास जनसामान्यांना विश्वास बसणार नाही एका  चार/साडेचार हजार लोकसंख्या असलेल्या गौर सारख्या गावाला शासनाकडून एवढा मोठ्या प्रमाणात विकासनिधी प्राप्त होईल म्हणून गावच्या विकासाचे सोडा हो गावातील जिल्हा परिषद शाळेला देखील शासनाकडून लाखो रुपयांचा शासकीय विकासनिधी प्राप्त झाल्यानंतर देखील शाळेतील विद्यार्थ्यांना मुलभूत सुविधांपासून वंचित ठेवण्याच महापाप गौर ग्रामपंचायतचे मुजोर ग्रामविकास अधिकारी लाढेकर आणि विद्यमान सरपंच सौ.चांगुनाबाई पारवे व त्यांचे प्रतिनिधी तथा भाजपा पुर्णा तालुकाध्यक्ष अनंतराव पारवे करीत असल्यामुळे संतप्त गावकरी मंडळीनी ग्रामविकास अधिकारी लाढेकर यांची भेट घेऊन शाळेतील विद्यार्थ्यांना स्वच्छ व निर्जंतूक पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे जेणेकरून विद्यार्थ्यांचे आरोग्य अबाधित राहिल त्यांना कुठल्याही प्रकारचे साथीचे आजार होणार नाही याकरिता शाळेतील वॉटर फिल्टर दुरूस्ती,वॉशबेसीनची व्यवस्था,पडझडीस आलेल्या शाळेच्या इमारत अर्थात खोल्यांची दुरूस्ती व्हावी म्हणून निवेदन दिले सदरील परिस्थिती संदर्भात जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांची शिस्टमंडळाने भेट घेतली असता मुख्याध्यापकांनी शाळेच्या विकासा संदर्भात शासनाकडून प्राप्त झालेला शासकीय विकासनिधी ग्रामपंचायत प्रशासनाकडे जमा असल्याचे सांगितले यानंतर शिस्टमंडळाने आपला मोर्चा गौर ग्रामपंचायतच्या मुजोर भ्रष्ट ग्रामविकास अधिकारी लाढेकर यांच्यांकडे वळवला परंतु ग्रामविकास अधिकारी लाढेकर यांनी नेहमी प्रमाणे शिस्टमंडळाला उडवाउडवीची उत्तर देऊन वेळ काढून नेल्याचे समजते.

💥गौर गातील जिल्हा परिषद शाळेसाठी शासनाकडून लाखो रुपयांचा निधी तरीही शाळेसह विद्यार्थ्यांची दुरावस्था :-


गौर गावातील जिल्हा परिषद शाळेच्या संरक्षण भिंत,शौचालय बांधकाम,शाळेसह/अंगणवाडी साहित्य खरेदी तसेच गावातील अंगणवाडी दुरूस्ती शाळा दुरूस्तीसाठी प्रथमतः २० लाख २२ हजार ९९२ रुपये व यानंतर पुन्हाजिल्हा परिषद शाळा दुरूस्ती,शाळा संरक्षण भिंत बांधकाम,शाळेतील शौचालय बांधकाम व शालेय साहित्य खरेदीसाठी १५ लाख २८ हजार ८४४ रुपयांचा शासकीय विकासनिधी प्राप्त झाल्यानंतर देखील गावातील जिल्हा परिषद शाळेसह अंगणवाड्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्यामूळे गौर ग्रामपंचायत प्रशासनावर भ्रष्टाचाराचा भस्मासूर अधिराज्य गाजवतोय की काय ? असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे...... 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या