💥परभणी जिल्ह्यात 92 टक्के मतदारांचे आधार लिंक अद्यापही बाकी...!


💥अशी माहिती निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी दिली💥

 परभणी (दि.19 आगस्ट) : परभणी जिल्ह्यातील एकूण मतदारांपैकी 91.94 टक्के मतदारांची मतदार नोंदणीशी आधारकार्ड लिंक अद्यापही बाकी असल्याची माहिती निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांनी दिली.

            येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज शुक्रवार दि.19 आगस्ट 2022 रोजी निवडणूक मतदान यादी विशेष संक्षित पुनर्निरीक्षण व आधार क्रमांक नोंदणी शिक्षक मतदार यादीच्या संदर्भात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, निवडणूक विभागाचे वरिष्ठ लिपीक नानासाहेब भेंडेकर हे उपस्थित होते. निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे 1 ऑगस्ट पासून जिल्ह्यात मतदार नोंदीशी आधारकार्ड जोडणी मोहिम राबविण्यात येणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 14 लाख 67 हजार 590 मतदारांपैकी केवळ 1 लाख 18 हजार 258 मतदारांच्या मतदार नोंदीशी आधारकार्ड क्रमांक जोडणी झाली आहे. बहुतांशी मतदारांच्या मतदार नोंदीशी आधारकार्ड जोडणीसंदर्भात 31 मार्च 2023 पर्यंत सर्वार्थाने प्रयत्न केले जाणार असू नत्यासाठी बीएलओ, ऑनलाईन पध्दतीने प्रयत्न केले जाणार आहेत, असेही उपजिल्हाधिकारी गायकवाड यांनी म्हटले.

            1 जानेवारी, एप्रिल, 1 जूलै व 1 ऑक्टोबर या अहर्ता दिनांकावर वार्षिक पुनर्निरीक्षण कार्यक्रमही राबविण्यात येणार असून  4 ऑगस्ट ते 24 ऑक्टोंबर दरम्यान पूर्व पूनर्निरीक्षण उपक्रमांतर्गत मतदान केंद्राचे सूसूत्रीकरण व प्रमाणीकरण करणे, मतदार नोंदी संदर्भातील त्रुटी दूर करणे, घरोघरी भेटी, तपासणी, पडताळणी, मतदान केंद्रांच्या सीमांची पूनर्ररचना, मतदान केंद्राच्या यादीला मान्यता घ्यावया संदर्भातही कारवाई केली जाणार आहे. 9 नोव्हेंबर रोजी एकीकृत प्रारुप यादी प्रसिध्द करण्यात येणार असून 8 डिसेंबर 2022 पर्यंत दावे व हरकती स्विकारल्या जाणार आहेत. 26 डिसेंबरपर्यंत सर्व दावे व हरकती निकाली काढण्यात येणार असून 3 जानेवारी 2023 पर्यंत अंतीम प्रसिध्दीसाठी आयोगाकडे परवानगीही मागितली जाणार आहे. डाटाबेस अद्ययावत करण्यासह अतिरिक्त पुरवणी याद्यांची छपाई 5 जानेवारी रोजी मतदार यांदीस अंतीमतः प्रसिध्दी केली जाणार आहे.

            जिल्ह्यात 5 जानेवारी 2022 च्या मतदार नोंदणीनुसार 14 लाख 76 हजार 821 मतदारांची संख्या आहे. यातील दोन ठिकाणी नोंदणी असणार्‍या मतदारांचा शोध घेवून आयोगाने मतदारांच्या भेटी घेवून एकाच ठिकाणी नोंदी ठेवल्या आहेत. त्यामुळे एका वर्षात 9 हजार 231 मतदारांची दुसर्‍या ठिकाणची नावे वगळल्या गेली आहेत, असेही उपजिल्हाधिकारी गायकवाड यांनी म्हटले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या