💥परळी येथील माधवबाग भागात अज्ञात चोरट्यांनी घरातील कपाटाचे लॉक उघडुन कपाटातील 90 हजार रुपये केले लंपास....!


💥शहरातील संभाजीनगर पोलिस स्थानकात घटने संदर्भात गुन्हा दाखल💥

परळी वैजनाथ (प्रतिनिधी ) - दररोज नोंद होत असलेल्या चोरीच्या घटनांनी खळबळ उडवून दिली आहे.परळी व  परिसरात चोरीच्या घटना सुरूच आहेत.परळी तालुक्यात चोरांना रान मोकळे झाले असल्याचे दिसून येत आहे. चोरट्यांनी धुमाकूळ घातला असुन काल चोरीची मोठी घटना विद्यानगर भागात घडली.तर आज जवळच्याच माधवबाग भागात चोरी झाली.या घटनांनी नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.  

        सध्याच्या काळात सर्वत्र चोरीच्या घटननांची साखळी खंडीत होत नसल्याने लोकांमध्ये एकप्रकारे मोठा धसका बसलेला आहे.अन्य कोणत्याही बाबींचा विचार न करता चोरीच्या घटनांपासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाचे प्राधान्य आहे.अशाही परिस्थितीत चोरट्यांची मनस्थिती मात्र बदललेली दिसत नाही.सर्वत्र चोरटे धुमाकूळ घालत आहेत. दररोज चोरीच्या घटनांची नोंद  होत आहे. दि.3 रोजी माधवबाग भागात फिर्यादी यांच्या घरी चोरी झाली आहे. घरात अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश करून घरातील  कपाटाचे लॉक उघडुन कपाटातील 90 हजार रुपये  लंपास केले.याप्रकरणी परळीत संभाजीनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या