💥‘स्वराज्य महोत्सव’ अंतर्गत 9 ते 17 ऑगस्टपर्यंत शासकीय कार्यालये राबविणार विविध उपक्रम.....!


💥यामध्ये मंगळवार दि. 9 ते 15 ऑगस्ट, 2022 या कालावधीत कार्यालयात उत्सवाची वातावरण निर्मिती💥 

 परभणी (दि.2 आगस्ट) : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या गौरवशाली पर्वानिमित्त जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायम स्वरूपी मनात राहावी व त्याचे संस्मरण व्हावे या उद्देशाने ‘आजादी का अमृत महोत्सव’ अंतर्गत दि. 9  ते 17 ऑगस्ट, 2022 या कालावधीमध्ये राज्यात ‘स्वराज्य महोत्सव’ अंतर्गत विविध उपक्रम/कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित 'हर घर तिरंगा' जिल्ह्यातील शासकीय काया्रलयात पुढीलप्रमाणे उपक्रम राबविण्याबाबत जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सूचना दिल्या आहेत.

            यामध्ये मंगळवार दि. 9 ते 15 ऑगस्ट, 2022 या कालावधीत कार्यालयात उत्सवाची वातावरण निर्मिती अधिक प्रभावी होण्यासाठी तसेच हा उत्सव शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचेल यासाठी विविध उपक्रमाचे आयोजन करावे. प्रत्येक कार्यालयात महोत्सवासंदर्भात 6'x4' चे किमान 2 बॅनर लावण्यात यावे. ज्या कार्यालयांना प्रशस्त प्रवेश लॉबी आहे त्या कार्यालयानी प्रवेश लॉबीत सुशोभिकरणासह सेल्फी बुथ उभारावे. तसेच 9 ते 15 ऑगस्ट या दरम्यान कार्यालयात भेटायला येणाऱ्या प्रत्येक अभ्यागताला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा संदर्भात माहिती देणारे पत्रक, स्वीटस, चॉकलेट व शक्य असल्यास एक तिरंगा बॅच भेट द्यावा. कार्यालय प्रमुखांच्या दालनात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या शुभेच्छा देणारे किमान एक बॅनर अथवा स्टॅन्डी असावी. स्वतंत्र इमारत असलेल्या कार्यालयांनी किमान 3 दिवस (13,14 व 15 ऑगस्ट) इमारतीवर विद्यूत रोषनाई करावी. तसेच प्रत्येक कर्मचाऱ्याने आपल्या (वर्क स्टेशनवर) टेबल व आजूबाजूला निटनेटकेपणा व स्वच्छता राखावी. टेबलवर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची (स्मॉल स्टॅन्डी : दूकानांमधे PayTM स्कॅनरची असते तशी) छोटी पाटी ठेवावी.

     प्रत्येक कर्मचारी-अधिकाऱ्यांनी दि. 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान भेटायला येणाऱ्या अभ्यांगताला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाविषयी व त्या संदर्भात आयोजित जिल्हा प्रशासनाच्या उपक्रमाविषयी माहिती द्यावी.  या उत्सवात सक्रिय सहभागी होण्यासाठी त्यांना प्रेरीत करावे. आपापल्या विभागाच्या स्थापनेपासून किंवा मागील 75 वर्षाचा वेध घेणारा आपल्या कार्यालयाचा एक फलक प्रदर्शित करण्यात यावा. ज्याद्वारे कार्यालयाच्या कामकाजाचा प्रगतीचा आलेख नागरिकांना दिसेल. आपापल्या कार्यालयातील कर्मचारी त्यांचे परिवारजन व इतर नागरिकांना सहभागी करून घेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करावे. शक्य असल्यास प्रत्येक कर्मचारी-अधिकाऱ्यांनी या दरम्यान आपल्या व्हॉटसअॅपच्या डीपीला स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा लोगो ठेवावा. त्याअनुषंगाने संदर्भिय शासन निर्णयात नमूद केल्यानुसार स्वराज्य महोत्सवानिमित्त तालूका स्तरावर विविध कार्यक्रमांचे नियोजन करण्यात यावे. आपले कार्यालय स्वच्छ, सुंदर, सुशोभीत, लोकाभिमुख व पर्यावरण पूरक करण्यात यावी. तसेच शासकीय इमारतीवर आजादी का अमृत महोत्सवाचा लोगो लावण्यात यावा. मुख्य इमारतीच्या दर्शनी भिंतीवर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाबाबत आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात करावी. आवश्यकतेप्रमाणे अन्य नाविण्यपूर्व उपक्रम या कालावधीमध्ये राबविण्यात यावे अशा सूचना जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सर्व कार्यालयाना दिल्या आहेत.....


                                                                           

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या