💥नांदेड येथील 29 मार्चच्या हल्ला मोहल्ला मिरवणुकीतील निरपराध सिख युवकांवरील खोटे गुन्हे तात्काळ रद्द करा....!


💥मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्याकडे निवेदनाव्दारे सामाजिक कार्यकर्ते स.जसबीरसिंघ बुंगई यांनी केली मागणी💥 


नांदेड (दि.११ आगस्ट) - येथील २९ मार्च २०२१ च्या हल्ला मोहल्ला मिरवणुकीतील घटने नंतर निरपराध सिख युवकांवर प्रशासनाकडून  खोटे गुन्हे दाखल करण्याचा गंभीर प्रकार घडला यावेळी या घटनेशी ज्या युवकांचा अर्थाअर्थी कुठलाही संबंध नव्हता अश्या निरपराध सिख युवकांना देखील या प्रकरणात गोवण्यात येऊन अल्पसंख्यांक सिख समाजाचे दमन करण्यात आले या प्रकरणातील सिख युवकांवर दाखल खोटे गुन्हे तात्काळ रद्द करण्यात यावे तसेच सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या जागांवरील सर्व आरक्षण देखील तात्काळ रद्द करून या सर्व जागा सचखंड हुजूर साहीब गुरूद्वारा बोर्डाला अर्थात सिख समाजाला वापस देण्यात याव्यात तसेच सचखंड हुजूर साहीब गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ.परविंदरसिंघ पसरीचा यांची निवड तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी नांदेड येथील सामाजिक कार्यकर्ते सरदार जसबीरसिंघ महेन्दरसिंघ बुंगई यांनी एका निवेदनाद्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्याकडे केली असून यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी या संदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला असून ते काय कारवाई करतात सर्वांचे लक्ष लागले आहे. 

 मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे हे दि.०८ आगस्ट २०२२ रोजी नांदेड-हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असतांना त्यांनी नांदेड येथील  पवित्र सचखंड गुरुद्वारात येवून दर्शन घेतले यावेळी सामाजिक कार्यकर्ते सरदार जसबीरसिंघ बुंगई यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना निवेदन दिले त्यांनी दिलेल्या निवेदनात २९ मार्च २०२१ च्या हल्ला मोहल्ला मिरवणुकीतील घटने नंतर निरपराध सिख युवकांवर प्रशासनाकडून खोटे गुन्हे दाखल करण्याचा गंभीर प्रकार घडल्याचे निदर्शनास आणून दिले यावेळी त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिलेल्या निवेदना असेही नमूद केले की पवित्र सचखंड गुरुद्वारा बोर्डाच्या जागेवरील झोन एफ.व झोन जी. मधील सर्व आरक्षण तात्काळ रद्द करावे तसेच चुकीच्या पद्धतीने भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप असतांनाही बोर्डाच्या प्रशासकपदी डॉ.परविंदरसिंघ पसरीचा यांची केलेली निवड तात्काळ रद्द करावी आदी मागण्यांवर आपण बारकाईने लक्ष देऊन सोडवाव्या अशी मागणी देखील सामाजिक कार्यकर्ते स. जसबीरसिंघ बुंगई यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात पुढे म्हटले की, नांदेड गुरुद्वारा सचखंड बोर्डाच्या जागेवरील झोन एफ. व जी. मधील सर्व आरक्षण रद्द करणे, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या सांगण्यावरुन दि.२९ जुन २०२२ रोजी गुरूद्वारा बोर्ड बरखास्त करून डॉ.परविंदर सिंग परारीचा यांची प्रशासक पदावर चुकीच्या पध्दतीने नियुक्ती केली.सन २००८ मध्ये गुरुतागद्दीच्या पार्शवभूमीवर हजारो कोटींचा भ्रष्टाचार केलेल्या डॉ. परविंदर सिंग पसरीचा यांची प्रशासक म्हणून केलेली नियुक्ती त्वरित रद्द करण्यात यावी व सिख समाजाला न्याय देण्यात यावा. मा. हायकोर्ट औरंगाबाद खंडपीठ यांनी डॉ. पसरीचा यांची २००८ गुस्तागद्दीच्या धार्मिक कार्यक्रमासाठी केलेल्या करोडो रूपयांच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी नांदेड जिल्हाधिकारी यांना नोटीस पाठविली असून सध्या जिल्हाधिकारी यांच्याकडे चौकशी प्रलंबित आहे. 

यासह सरदार जसबीरसिंघ बुंगई यांनी पवित्र सचखंड गुरुद्वारा परिसरात २८ मार्च २०२१ रोजी धार्मिक परंपरे नुसार आयोजित हल्ला मोहल्ला कार्यक्रमामध्ये काही तरूणांना प्रशासना कडून जाणीवपूर्वक फसविण्यात आले आहे. त्यामध्ये निर्दोष सिख समाजातील लोकांवर खोटे गुन्हे दाखल झालेले असून पोलीस प्रशासनाकडून सिख समाजाच्या घरामधून तब्बल ३०० से ४०० वर्षे जुने धार्मिक पुजेसाठी ठेवलेले पुरातन अनमोल शस्त्र तलवारी प्रशासनाकडून कायद्याची पायमल्ली करून सिख समाजाच्या भावनांची अव्हेलना करीत घरांतून जप्त करण्यात आले ते त्वरित पूजेचे शस्त्र सिख समाजाला परत मिळावे, आदी मागण्या मान्य करून शीख समाजाला न्याय द्यावा, असेही निवेदनात सामाजिक कार्यकर्ते स. जसबीरसिंघ महेन्दरसिंघ बुंगई यांनी केले आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या