💥जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण 2022-23 अंतर्गत कार्यान्वयीन यंत्रणांना जिल्हाधिकारी यांचे कामाचे निर्देश....!


💥कार्यान्वयीन यंत्रणांच्या प्राप्त झालेल्या याद्यांचे जिल्हाधिकारी गोयल यांनी स्वत: केले अवलोकन💥

परभणी (दि.18 आगस्ट) : जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2022-23 कार्यान्वयीन यंत्रणांकडून प्राप्त झालेल्या कामांच्या याद्यांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी कामाचे निर्देश दिले आहेत. जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2022-23 अंतर्गत कार्यान्वयीन यंत्रणांकडून प्राप्त झालेल्या कामांच्या याद्यांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी दि. 10 ऑगस्ट, 2022 रोजी जिल्हा नियोजन अधिकारी यांच्या उपस्थितीत आढावा घेतला. कार्यान्वयीन यंत्रणांच्या प्राप्त झालेल्या याद्यांचे जिल्हाधिकारी गोयल यांनी स्वत: अवलोकन करुन संबंधित कार्यान्वयीन यंत्रणांना दि. 19 ऑगस्ट, 2021 पर्यंत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत.

      सर्व कार्यान्वयीन यंत्रणा सर्व योजनेची कामे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी जिल्हा परिषद यांना जिल्हा परिषदेकडील दवाखाने केंद्र बांधणे, पशुवैद्यकीय दवाखान्यात औषध पुरविणे, जनावरांना खाद्य उपलब्धतेसाठी  सुधारणा कार्यक्रम, एकात्मिक कुकुट विकास कार्यक्रम, पशुसंवर्धनासाठी प्रदर्शन व प्रचार कार्यक्रम. दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यांना एकात्मिक दुध उत्पादन कार्यक्रम राबविणे. तर शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद यांना सर्व योजना व कामे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांना जिल्हा ग्रंथालयाची स्थापना बांधकाम व विकास, जिल्हा क्रिडा अधिकारी यांना व्यायाम शाळांचा विकास क्रीडागणाचा विकास, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना अंगणवाडी बांधकाम व दुरुस्ती, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांना सर्व योजना व कामे, जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांना सर्व योजना, प्रशासन अधिकारी/नगरपालिका प्रशासन/मुख्याधिकारी नगर परिषद सर्वांना महाराष्ट्र नगरोत्थान महाभियान/ नागरी दलितेत्तर वस्त्यांमध्ये सुधारणा, आयुक्त परभणी शहर महापालिका यांना नागरी दलितेत्तर वस्त्यांमध्ये सुधारणा, कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद यांना अपारंपारिक उर्जा विकास, जिल्हा रेशीम विकास अधिकारी यांना रेशीम उत्पादन उद्योगाचा विकास, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग जिल्हा परिषद यांना ग्रामीण रसते विकास व मजबुतीकरण, इतर जिल्हा रस्ते मजबुतीकरण, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना शासकीय कार्यालयीन इमारती, शासकीय निवास इमारती, सार्वजनिक जमिनीवरील अतिक्रमण रोखण्यासाठी अशा जागेभोवती संरक्षक भिंत बांधणे, पोलिस अधिक्षक यांना पोलिस व तुरुंग विभागाच्या आस्थापना मधील पायाभुत सुविधा पुरविणे आदी बाबींच्या अनुषंगाने  सर्व संबंधित कार्यान्वयीन यंत्रणांच्या प्रमुखांनी शुक्रवार दि. 19 ऑगस्ट, 2022 पर्यंत आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी असे कळविले आहे. असे जिल्हा नियोजन अधिकारी परभणी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या